How To Travel From Mumbai Central To Malwan

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे माझा Mumbai Central To Malwan ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

तर मित्रांनो मी मुंबई सेंट्रल स्टँड वर नेहमीप्रमाणे अर्धा तास अगोदरच माझ्या गाडी पकडण्यासाठी ह्या ठिकाणी आलो होतो.

Mumbai Central To Malwan Distance

Mumbai Central To Malwan Distance

Mumbai Central To Malwan हा जवळजवळ 500 किलोमीटरचा प्रवास होता. मी ज्या गाडीने प्रवास केला ती सिंधुदुर्ग विभागाची आणि मालवण आगाराची होती.Mumbai to Malwan पोहोचण्यासाठी जवळपास 13 तासांचा कालावधी लागतो.

Mumbai Central To Malwan MSRTC Bus Timetable

Mumbai Central Bus Stand वरून Malwan जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.

FromToTimingsRoutes
Mumbai CentralMalwan4:00Mahad, Chiplun, Sangameshwar, Rajapur, Kankavli

ही गाडी सकाळी 4:00 वाजता लागते. ही गाडी पूर्णपणे बुकिंग गाडी आहे जर तुम्हाला हा लांब पल्याचा प्रवास करण्याची इच्छा झाली तर तुम्ही आपले सीट रिझर्वेशन करून सुद्धा ह्या गाडीने प्रवास करू शकता.

ह्या गाडीचा मार्ग मुंबई सेंट्रल वरून महाड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली आणि शेवटी मालवण अशाप्रकारे होता.

तर मित्रांनो बरोबर 4:00 वाजता माझी गाडी मुंबई सेंट्रल वरून आपला टप्पा गाठण्य्साठी पळायला सुरू केली. मुंबई सेंट्रल वरून पुढे परळ बस स्टैंड वर सकाळी 4:30 वाजता पोहोचत पुढे परत एकदा मुंबईच्या रस्त्यावरून धावत दादर ह्या ठिकाणी नंतर पुढे कुर्ला नेहरूनगर बस स्टैंड वर सकाळी 4:40 वाजता पोहोचल्यानंतर परत एकदा आपला पुढचा टप्पा गाठायला सुरू करते.

माझी बस वाशी फुलाच्या वरून प्रवास करत पुढे पनवेल बस स्टैंड वर सकाळी 5:30 वाजता पोहोचली. इथून पुढे माझी बस आता मुंबई गोवा हायवे चा प्रवास करण्यासाठी परत एकदा धावू लागली.

तर मित्रांनो परत एकदा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे वरून प्रवास करत माझी बस रामवाडी म्हणजे पेण बस स्टैंड वर सकाळी 6:15 वाजता पोहोचली.

आतापर्यंत मुंबई सेंट्रल पासून 80 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण झाला होता.

इथून पुढे परत एकदा प्रवास करत माझी बस नागोठने नंतर कुंडलिका नदीच्या पुलावरून प्रवास करत कोलाड ह्या ठिकाणावरून होत पुढे इंदापूर ह्या ठिकाणी सकाळी 7:30 वाजता पोहोचत माझी बस आता माणगाव बस स्टँडवर सकाळी 7:45 वाजता पोहोचली.

माणगाव बस स्टॅन्ड हा रायगड जिल्हा अंतर्गत मोडतो. मुंबई जिल्हा नंतर आता माझी गाडी रायगड जिल्हा मध्ये दाखल झाली होती. ह्या मार्गावरील मला चार जिल्ह्यांचा प्रवास झाला. जे काही अशा प्रकारे आहेत मुंबई जिल्हा नंतर रायगड जिल्हा नंतर रत्नागिरी आणि तसेच शेवटी सिंधुदुर्ग जिल्हा अशा प्रकारे हे चार जिल्हे आहेत.

माणगाव ते महाडचा जवळपास 28 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

तर मित्रांनो परत एकदा एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करत माझी बस्स आता महाड बस स्टैंड वर सकाळी 8:30 वाजता पोहोचत पुढे राजेवाडी ह्या ठिकाणी सावित्री नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता पोलादपूर बस स्टैंड वर सकाळी 8:50 वाजता पंधरा मिनिट चहा पिण्यासाठी थांबा घेते.

Mumbai Central to Malwan Ticket Price

मुंबई सेंट्रल ते मालवण चा तिकीट भाडं 800 रुपये आहे जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे ह्याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.

इथून पुढे माझी बस कशेडी घाट पार करत पुढे खेड जवळ भरणा नाका कडून पुढे परशुराम घाट पार करत माझी बस चिपळूण बस स्टैंड वर सकाळी 10:45 वाजता पोहोचली.

चिपळूण बस स्टँड वरून मालवण 230 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. चिपळूण हा रत्नागिरी जिल्हा अंतर्गत मोडतो.चिपळूण बस डेपो येथे ह्या गाडीमध्ये डिझेल भरला जातो.

तब्बल वीस मिनिटं चिपळूण बस स्टैंड वर थांबल्यानंतर माझी परत एकदा हायवे वरून प्रवास करत सावर्डे नंतर संगमेश्वर बस स्टॅन्ड वर दुपारी 12:00 वाजता पोहोचत पुढे कुरदुंडा इथे दुपारी12:15 वाजता हॉटेल राजमुद्रा इथे जेवणासाठी थांबली.

इथून पुढे मालवण पोहोचण्यासाठी 120 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

जेवण झाल्यानंतर परत एकदा रस्त्यावरून प्रवास करत बाव नदीच्या बाजूने होत माझी बस आता पाली बस स्टैंड वर दुपारी 1:45 वाजता पोहोचली.

पुढे बराच काळ हायवेवरून प्रवास करत लांजा बस स्टँडवर 2:30 वाजता पोहोचत परत एकदा आपला प्रवास सुरू करत आता माझी बस राजापूर बस स्टैंड वर दुपारी 3:00 वाजता पोहोचली.

राजापूर ते मालवण जवळजवळ 100 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

राजापूर बस स्टॅन्ड पासून पुढे खारेपाटण ह्या ठिकाणावरून होत आता माझी बस तळेरे बस स्टैंड वर दुपारी 3:40 वाजता पोहोचली.

बराच काळ हायवे वरून प्रवास केल्यानंतर माझी बस कणकवली बस स्टैंड वर दुपारी 4:15 वाजता पोहोचली. कणकवली बस स्टँड वर एकूण आठ फलट दिलेले आहेत.

Mumbai Central To Malwan Final Destination

इथून पुढे परत एकदा हायवे वरून प्रवास करत कसाल बस स्टैंड वर पोहोचल्यानंतर पुढे कसाल मालवण हायवेवरून धावत कट्टा नंतर माझी बस मालवण बस स्टैंड वर संध्याकाळी 5: वाजता पोहोचली. हीच गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता मुंबई सेंट्रल जाण्यासाठी निघते.

तर अशाप्रकारे माझा मुंबई चा हा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

Which bus operator offers the cheapest fare from Mumbai Central To Malwan?

msrtcbus

How long does it take to drive from Mumbai Central To Malwan?

13 Hours

What is Mumbai Central To Nagpur msrtc bus ticket price?

800 Rupees

1 thought on “How To Travel From Mumbai Central To Malwan”

Leave a Comment