नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Sawantwadi To Ratnagiri ह्या मार्गावरील केलेला प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
मी ज्या गाडीने प्रवास केला त्या गाडीचा नंबर MH 14 AQ 3517 अशाप्रकारे होता. ही गाडी सिंधुदुर्ग विभागाची तसेच सावंतवाडी आगाराची होती.सावंतवाडी बस स्टँडचा बांधकाम जुनाच आहे. तसे हा बस स्टँड खूप मोठा आणि विशाल आहे.सावंतवाडी बस स्टँड कोंकण भागात आहे.बरोबर सकाळी 7:30 वाजता माझी गाडी सावंतवाडी बस स्टँड मधून बाहेर पडली.
Table of Contents
Sawantwadi To Ratnagiri Distance

Sawantwadi To Ratnagiri चा अंतर जवळपास 170 किलोमीटरचा आहे. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास सहा तासांचा कालावधी लागला.
Sawantwadi To Ratnagiri Ticket Price
Sawantwadi To Ratnagiri चा तिकीट दर 300 रुपये होता जे कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.
Sawantwadi To Ratnagiri MSRTC Bus Timetable
Sawantwadi Bus Stand वरून Ratnagiri जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.
| From | To | Timings | Routes |
| Sawantwadi | Ratnagiri | 7:30, 10:00, 12:45, 14:30 | Kudal,Oras,Kankavali,Kharepatan,Rajapur,Lanja,Pali |
सावंतवाडी बस स्टँड मधून बाहेर पडल्यानंतर माझी गाडी आता ह्या जबरदस्त असा रस्त्यावरून धावत असताना अकेरी ह्या ठिकाणावरून होत पुढे जांभरमळा नंतर टेंबधुरीनगर नंतर पुढे डाव्या बाजूवाला वळत कुडाळ बस स्टैंड वर सकाळी 8:00 वाजता पोहोचली.गाडी मध्ये कमीच प्रवाशी बसले होते म्हणा.
कुडाळ बस स्टँडवरून पुढे आता माझी बस परत एकदा सिंगल रस्त्यावरून धावू लागली. कुडाळ पासून रत्नागिरी 155 किलोमीटर चा अंतर शिल्लक राहिला होता.कुडाळ बस स्टँडवर खूपच गर्दी पाहायला मिळाली.
हायवेवरून पुढे बेलनदी ह्या ठिकाणी करली नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे पांडुर नंतर ओरस बस स्टँड वर सकाळी 8:30 वाजता पोहोचली.
ओरस बस स्टँड हा माझा मार्गावरील दुसरा टप्पा होता. ओरस बस स्टँड हा खूप जुना बांधकाम असणारा तसेच आतला परिसर पूर्णपणे मातीचा आहे.ओरस बस स्टँड हा हायवे सोडून खूप आत आहे.ह्या मुळे माझ्या गाडीला परत मुंबई गोवा हायवेवर येऊन प्रवास करावा लागला.
इथून पुढे परत एकदा हायवेवरून प्रवास करत पुढे वागदे नंतर गड नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता कणकवली बस स्टैंड वर फलाट क्रमांक 3 वर सकाळी 9:00 वाजता पोहोचली. कणकवली बस स्टॅन्ड ला एकूण आठ फलट दिलेले आहेत.कणकवली बस स्टॅन्डचा बांधकाम जुनाच आहे आणि इथले रस्ते मातीचं आहे.
पावसाळी दिवसा मध्ये खूप त्रास सहन करावा लागतो.ह्या ठिकाणी खूपच गर्दी दिसली.ह्या बस स्टँडच्या फलाट क्रमांक 2 वरून रत्नागिरी,देवरूख,मिठबांव,तांबाळडेग, विजदुर्ग,दापोली,देवगड,तळेरे ह्या सगळ्या मार्गावर सुटतात आणि फलाट क्रमांक 3 वरून पणजी,बेळगाव,सावंतवाडी,बांदा ,सिंधुदुर्ग नागरी,वेंगुर्ला आणि कुडाळ ह्या मार्गवर प्रवास करतात.
इथून पुढे लांजा मार्गे माझी गाडी आता 122 किलोमीटरचा अंतर गाठण्य्साठी परत एकदा कणकवली बस स्टँडच्या बाहेर पडत धावू लागली.
बराच काळ मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करत माझी बस नांदगाव ह्या ठिकाणावरून होत पुढे तळेरे बस स्टँडवर सकाळी 9:30 वाजता पोहोचली.
तळेरे बस स्टँड पासून राजापूर हा 33 किलोमीटरचा अंतर आहे. आतापर्यंत सावंतवाडी ते तळेरे बस स्टँड हा 77 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता.तळेरे बस स्टँड वरून भरपूर प्रवाशी गाडी चढले.
बराच काळ हायवेवर प्रवास करत माझी बस वारगाव ह्या ठिकाणावरून होत पुढे नडीगिवे नंतर खारेपाटण बस स्टैंड वर सकाळी 10:00 वाजता पोहोचली. रस्त्याचा कडेला असणारा हे खारेपाटण बस स्टँडवरून राजापूर हा 20 किलोमीटरचा अंतर आहे.
बराच काळ हायवे वरून प्रवास करत माझी बस राजापूर बस स्टैंड वर सकाळी 10:30 वाजता पोहोचली.राजापूर बस स्टैंड वर लांजा आगाराचे भरपूर गाड्या दिसतील.
आतापर्यंत सावंतवाडी पासून 109 किलोमीटरचा अंतर पार केला होता. तसेच राजापूर बस स्टँड पासून रत्नागिरी हा 66 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.
राजापूर बस स्टँड पासून पुढे आता माझी बस परत एकदा मुंबई गोवा हायवे वरून प्रवास करत नेरकेवाडी नंतर ओणी नंतर वाटुळ तसेच लांजा बस स्टैंड वर माझी बस सकाळी 11:30 वाजता पोहोचली.
तसेच पुढे परत एकदा देवडे ह्या ठिकाणावरून होत काजळी नदी च्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता पाली बस स्टैंड वर पोहोचत पुढे 22 किलोमीटरचा अंतरावर रत्नागिरी गाठण्यासाठी परत एकदा माझी बस हायवेवरून प्रवास करायला सुरू करते.पाली बस स्टैंडचा बांधकाम जुना आणि आतला परिसर सुद्धा मातीचं आहे.
Sawantwadi To Ratnagiri Final Destination
धावत असताना हातखंबा नंतर कुवारबाव नंतर रत्नागिरी शहराच्या जवळ शिवाजीनगर ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे मारुती मंदिर नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इकडून होत माझी बस आता रत्नागिरी बस स्टैंड वर दुपारी 1:00 वाजता पोहोचली.
- Distance: 170 किलोमीटर
- Routes: Kudal,Oras,Kankavali,Kharepatan,Rajapur,Lanja,Pali
- Timings: 7:30, 10:00, 12:45, 14:30
- Travel Duration: 4.30 Hours
- Ticket Price: 300 रुपये
अशाप्रकारे माझा सावंतवाडी ते रत्नागिरी चा हा प्रवास पूर्ण झाला.
Read more
How to Travel from Sawantwadi To Ganagapur By Bus
FAQs
How long does it take to drive from Sawantwadi To Ratnagiri?
4.30 Hours