नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Nagpur To Shirdi ह्या मार्गावरील प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
Table of Contents
Nagpur To Shirdi Distance

नागपूर ते शिर्डीचा हा अंतर तब्बल 650 किलोमीटर आहे.तर मित्रांनो मी नागपूर गणेश पेठ बस स्टैंड इथून माझा प्रवासाची सुरुवात केली.
Nagpur To Shirdi Ticket Price
Nagpur To Shirdi चा तिकीट भाडं जवळपास 1200 रुपये आहे जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
Nagpur To Shirdi MSRTC Bus Timetable
Nagpur Bus Stand वरून Shirdi जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.
| From | To | Timings | Routes |
| Nagpur | Shirdi | 9:00 | Amravati, Akola, Shegaon, Khamgaon, Jalna, Chhatrapati Sambhajinagar, Shrirampur |
तर बरोबर सकाळी 9:00 वाजता माझी बस आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी नागपूर गणेश पेठ बस स्टँड मधून बाहेर पडली.
ह्या गाडीचा मार्ग नागपूर पासून अमरावती, अकोला, शेगाव, खामगाव ,जालना, छत्रपती संभाजी नगर, श्रीरामपूर आणि शेवटी शिर्डी अशा प्रकारे होता.ह्या गाडीचा नंबर MH 14 MH 2361 होता.
नागपूर मुंबई हायवे वरून बराच काळ प्रवास करत माझी बसा आता कारंजा बस स्टैंड वर सकाळी 10:45 वाजता पोहोचली.
नागपूर पासून कारंजा हा 75 किलोमीटरचा अंतर माझा पार झाला होता. ह्या ठिकाणी माझी बस नाश्त्यासाठी थांबा घेते.
इथून पुढे परत एकदा हायवे वरून प्रवास करत तिवसा घाट पार करत माझी बस आता तळेगाव बस स्टैंड वर पोहोचत पुढे परत एकदा हायवेवरून धावत माझी बस अमरावती बस स्टैंड वर दुपारी 12:21 वाजता पोहोचली.
नागपूर पासून अमरावती 150 किलोमीटरचा हा माझा प्रवास पूर्ण झाला होता. हा अंतर पार करण्यासाठी मला जवळपास अडीच तासांचा कालावधी लागला.
इथून पुढे थोडासा अंतरावर असणारा राजापेठ बस स्टैंड वर माझी बस दुपारी 12:30 वाजता पोहोचली.इथून पुढे मला 150 किलोमीटरचा टप्पा पार करायचा शिल्लक राहिला होता.
इथून पुढे अमरावती शहरामध्ये असणारा तिसरा बस स्टॅन्ड म्हणजे बडनेरा बस स्टॅन्ड येथे माझी बस पोहोचल्यानंतर पुढे परत एकदा रस्त्यावरून धावू लागते.
पुढे सुरत कोलकाता हायवेवरून बराच काळ प्रवास करत माझी बास मूर्तिजापूर बस स्टैंड वर दुपारी 1: वाजता पोहोचली.
तसेच पुढे परत एकदा हायवे वरून धावत अकोला बस स्टैंड वर दुपारी 2:45 वाजता फलाट क्रमांक दोनवर पोहोचली.
अकोला शेगाव हायवे वरून प्रवास करत माझी बस शेगाव बस स्टैंड वर दुपारी 3:45 वाजता पोहोचली.शेगाव बस स्टैंड वर चालक आणि वाहक यांची बदली झाली.शेगाव पासून 315 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.
आतापर्यंत नागपूरपासून शेगाव 300 किलोमीटरचा अंतर पार झाला होता.बराच काळ हायवेवरून वरून प्रवास करत माझी बस खामगाव बस स्टैंड वर दुपारी 4:30 वाजता पोहोचली.
इथून पुढे माझी बस नागपूर संभाजीनगर हायवे वरून धावत उंदरी नंतर अमडापूर नंतर पुढे चिखली बस स्टँडवर माझी बस पुढे चिखली पासून पाच किलोमीटर अंतरावर हायवे लगत असणारा हॉटेल कोल्हापुरी येथे संध्याकाळी 6:00 वाजता जेवणासाठी थांबा घेते. चिखली हा विदर्भातील शेवटचा स्थान आहे.
इथून पुढे माझी बस आता मराठवाडा भागात प्रवास करणार होती.नागपूर संभाजीनगर हायवे वरून परत एकदा प्रवास करत माझी बस देऊळगाव राजा बस स्टँडवर पुढे जालना बस स्टँडवर रात्री 8:30 वाजता फलट क्रमांक बारावर पोहोचली.
इथून पुढे बराच काळ हायवेवरून प्रवास केल्यानंतर माझी बस छत्रपती संभाजी नगर सिडको बस स्टैंड वर रात्री 9:30 वाजता पोहोचली.
आतापर्यंत नागपूरपासून छत्रपती संभाजी नगर साडेबारा तासांचा हा प्रवास माझा पूर्ण झाला होता.सिडको बस स्टँडवरून पुढे माझी बस आता मध्यवर्ती बस स्टैंड वर रात्री 9:50 वाजता पोहोचली.
Nagpur To Shirdi ह्या मार्गावर प्रवास करत असताना नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा,बुलढाणा जिल्हा,जालना आणि छत्रपती संभाजी नगर जिल्हा ह्या सगळ्या जिल्ह्यामधून माझा प्रवास पूर्ण झाला होता.
इथून पुढे अहमदनगर जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा मध्ये प्रवास माझा शिल्लक राहिला होता.अशा प्रकारे माझा हा प्रवास पूर्णपणे 8 जिल्ह्यामधून झाला.
छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर हायवे वरून प्रवास करत पुढे नेवासा ह्या ठिकाणी रात्री 11:50 वाजता पोहोचत आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा नेवासा श्रीरामपूर हायवेवरून प्रवास करण्यास सुरू करते.
Nagpur To Shirdi Final Destination
श्रीरामपूर ह्या ठिकाणी रात्री 12:30 वाजता पोहोचत पुढे धुळे सोलापूर हायवे वरून प्रवास करत माझी बस आता शेवटी शिर्डी बस स्टैंड वर रात्री 1:30 वाजता पोहोचली. हीच गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता नागपूर जाण्यासाठी तयार होते.
अशाप्रकारे माझा Nagpur To Shirdi चा हा प्रवास पूर्ण झाला.
FAQs
Are there Buses from Nagpur To Shirdi?
Yes
What is the minimum bus ticket fare from Nagpur To Shirdi?
1200 Rupees