नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Pune To Nagpur स्लीपर बस ने केलेला हा प्रवास बद्दल माहिती पुरवणार आहे.
तर माझी प्रवासाची सुरुवात पुणे शिवाजीनगर बस स्टँड मधून झाली. ही गाडी गणेश पेठ अगरातली आणि नागपूर विभागाची होती. ह्या गाडीचा नंबर MH 14 LB 0654 अशाप्रकारे होता.
Table of Contents
Pune To Nagpur Distance

Pune To Nagpur चा हा अंतर जवळपास 750 किलोमीटरचा आहे. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास 16 तासांचा कालावधी लागतो.
Pune To Nagpur MSRTC Sleeper Bus Ticket Price
Pune To Nagpur स्लीपर गाडीचा तिकीट दर 1600 रुपये आहे.
Pune To Nagpur MSRTC Bus Timetable
Pune Bus Stand वरून Nagpur जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.
| From | To | Timings | Routes |
| Pune Shivaji Nagar Wakdewadi | Nagpur | 13:00, 16:00 Shivshahi Sleeper: 17:00, 19:30 | Ahilyanagar (Ahmednagar), Chatrapati Sambhaji Nagar (Aurangabad), Badnapur, Jalna, Deulgaon Raja, Chikhali, Khamgaon, Akola, Murtizapur, Badnera, Amravati, Tivsa |
तर मित्रांनो फलट क्रमांक 18 वरून संध्याकाळी 7:30 वाजता माझी बस आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी निघाली.
ह्या गाडीचा मार्ग पुणे पासून अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती आणि शेवटी नागपूर अशा प्रकारे होता.
पुणे शहरातून बाहेर पडत अहमदनगर पुणे हायवे वरून प्रवास करत माझी बस शिक्रापूर ह्या ठिकाणावरून पुढे शिरूर नंतर वाडेगाव ह्या ठिकाणी हॉटेल महिंद्र ह्या ठिकाणी रात्री 10:20 वाजता जेवणासाठी थांबा घेते.
तब्बल 20 मिनिटात जेवणासाठी थांबा केल्यानंतर आता माझी बस परत एकदा पुढचा प्रवास करण्यासाठी अहमदनगर नागपूर हायवे वरून धावू लागली.
प्रवास करत असताना सुपा ह्या ठिकाणावरून होत पुढे अहमदनगर संभाजीनगर हायवेवरून प्रवास करत माझी गाडी आता छत्रपती संभाजी नगर बस स्टैंड वर रात्री 2:15 वाजता पोहोचली.आतापर्यंत पुणे पासून 236 किलोमीटरचा हा अंतर पार करत मी आता छत्रपती संभाजीनगर बस स्टँड वर पोहोचलो होतो.
इथून पुढे 58 किलोमीटरच्या अंतरावर स्थित असणारा जालना बस स्टैंड पोहोचण्यासाठी माझी गाडी परत एकदा हायवेवरून प्रवास करू लागली. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास दीड ते दोन तासांचा कालावधी लागला.
बराच काळ हायवे वरून प्रवास करत माझी बस छत्रपती संभाजी नगर सिडको बस स्टैंड वर रात्री 2:30 वाजता पोहोचली.
रात्रीच्या यावेळी बराच काळ हायवे वरून प्रवास करत माझी बास आता जालना बस स्टैंड वर रात्री 3:30 वाजता पोहोचली.
इथून पुढे 200 किलोमीटरच्या अंतरावर असणारा अकोला ह्या ठिकाणी पोहोचण्यासाठी माझी बस परत एकदा पुढचा टप्पा गाठण्यासाठी धावू लागली.
आतापर्यंत पुणे पासून 300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता. इथून पुढे जवळपास 400 किलोमीटरचा प्रवास करण्यास शिल्लक राहिला होता.
आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र पासून मराठवाडा हा माझा प्रवास पूर्ण झाला होता इथून पुढे माझी बस आता विदर्भ मध्ये प्रवास करण्यास सुरू झाली.ह्या ठिकाणी गाडीचे चालक यांची बदली झाली.
इथून पुढे नागपूर संभाजीनगर हायवेवरून प्रवास करत देऊळगाव राजा ह्या ठिकाणावरून होत तसेच चिखली बस स्टँडवर सकाळी 5:30 वाजता पोहोचली.
बराच काळ अहमदापूर जानेफळ हायवे वरून प्रवास करत पुढे खामगाव बस स्टैंड वर सकाळी 6:30 वाजता पोहोचली.
खामगाव ते अकोला जवळपास 50 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.
खामगाव बस स्टँड हा बुलढाणा विभाग अंतर्गत मोडतो. इथून पुढे मुंबई नागपूर एक्सप्रेस हायवे वरून प्रवास करत माझी बस अकोला बस स्टैंड वर सकाळी 7:30 वाजता पोहोचली.
इथून पुढे अकोला ते अमरावतीचा हा प्रवास माझी एसटी आता गाठणार होती हा अंतर जवळपास 94 किलोमीटरचा आहे ह्याला कमीत कमी दोन तासांचा कालावधी लागतो.
परत एकदा हायवेवरून प्रवास करत बडनेरा इकडून माझी बस अमरावती ह्या ठिकाणी राजपेट बस स्टैंड वर पोहोचत पुढे अमरावती शहरामध्ये दुसरा बस स्टँड मध्यवर्ती बस स्टॅन्ड वर सकाळी 9:30 वाजता पोहोचली.
इथून अमरावती ते नागपूर 160 किलोमीटर अंतर पार करायचा शिल्लक राहिला होता. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास चार तासांचा कालावधी लागतो.
परत एकदा हायवे वरून बरच काळ प्रवास करत पुढे तळेगाव ह्या ठिकाणी नंतर कारंजा बस स्टँडवर सकाळी 11:00 वाजता फलट क्रमांक सहावर पोहोचली होती. ह्या ठिकाणी माझी बस जवळपास 15 मिनिटं नाश्त्यासाठी थांबा घेते.
Pune To Nagpur Final Destination
इथून पुढे कोंढाळी नंतर नागपूर येथे सीताबर्डी नंतर नागपूर गणेश पेठ बस स्टैंड वर दुपारी 12:45 वाजता पोहोचली.
अशाप्रकारे माझा पुणे शिवाजी नगर ते नागपूर चा हा 17 तासांचा लांब पल्याचा प्रवास पूर्ण झाला.
FAQs
When does the first Pune To Nagpur bus leave for the day?
13:00
When does the last Pune To Nagpur bus leave for the day?
19:30 Sleeper Bus
What are the boarding points from Pune To Nagpur?
अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती
What are the Pune bus timings?
Shivshahi : 13:00, 16:00, Sleeper : 17:00, 19:30