How To Travel From Thane To Raver

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Thane To Raver अमळनेर मार्गे ह्या मार्गावरील केलेला प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

तर मी होतो ठाणे जिल्ह्यातील ठाणे खोपट बस स्टॅन्ड इथे माझी एसटीची वाट पाहत उभा होतो.

Thane To Raver Distance

Thane To Raver Distance

Thane To Raver अमळनेर मार्गे हा जवळपास 550 किलोमीटरचा प्रवास होता. जवळपास हा माझा 13 तासांचा प्रवास होता.

Thane To Raver Ticket Price

Thane To Raver अमळनेर मार्गे चा टिकीट दर जवळपास 850 रुपये होता जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे .ही गाडी ठाणे जिल्हा पासून नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्हा ह्या चार जिल्ह्यामधून प्रवास केला.

Thane To Raver MSRTC Bus Timetable

Thane Bus Stand वरून Raver जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.

FromToTimingsRoutes
Thane CBS Khopat Raver  09:30Via Jalgaon
Thane CBS Khopat Raver 6:00, 09:30, Bhiwandi, Nashik CBS, Malegaon, Dhule, Parola, Erandol, Jalgaon, Bhusawal, Faizpur, Savada

तर माझी गाडी बरोबर 7:45 वाजता ठाणे जिल्ह्यातील ठाणे खोपट बस स्टँड आणि फलाट क्रमांक चार वरून बाहेर पडली.

फलट क्रमांक चार वरून जळगाव, धुळे, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, नंदुरबार आणि चोपडा ह्या मार्गावर जाणारे बसेस प्लॅटफॉर्मवरून सुटतात.

ह्या गाडीचा मार्ग ठाणे पासून नाशिक, मालेगाव, धुळे, अमळनेर, चोपडा, यावल आणि शेवटी रावेर अशा प्रकारे होता.

हायवे वरून प्रवास करत असताना भिवंडी बस स्टैंड वर सकाळी 8:38 वाजता पोहोचली. इथून पुढे परत एकदा मुंबई नाशिक हायवे वरून प्रवास करत माझी बस शहापूर बस स्टैंड वर सकाळी 9:45 वाजता पोहोचली. शहापूर येथे ह्या गाडी मध्ये डिझेल भरला जातो.

शहापूर बस स्टॅन्ड मधून पुढे आता माझी परत एकदा हायवेवरून प्रवास करत सकाळी 10:00 वाजता हायवे लागत असणारा हॉटेल दुर्गा डायमंड ह्या ठिकाणी जेवणासाठी थांबली.

ह्या गाडीचा नंबर MH 14 BT 1457 अशाप्रकारे होता.

इथून पुढे कसारा घाट पार करत माझी बस आता नाशिक बस स्टँड वर सकाळी 10:30 वाजता पोहोचली.

आतापर्यंत ठाणे ते नाशिक 150 किलोमीटरचा अंतर पार झाला होता. इथून पुढे नाशिक मालेगाव हायवे वरून प्रवास करत चांदवड ह्या ठिकाणावरून होत माझी बस मालेगाव बस स्टैंड वर दुपारी 12:45 वाजता पोहोचली.

इथून पुढे माझी बस माळेगाव ते धुळे चा 50 किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी परत एकदा हायवेवरून प्रवास करायला सुरू करते.

झोडगे ह्या ठिकाणावरून होत धुळे बस स्टैंड वर दुपारी 2:15 वाजता पोहोचली.

इथून पुढे माझी बस अमळनेर गाठण्यासाठी परत एकदा धुळे बस स्टँड मधून बाहेर पडली. धुळे ते अमळनेर चा अंतर 30 किलोमीटर आहे.

धुळे अमळनेर हायवे वरून प्रवास करत वणी बुद्रुक नंतर नवल नगर नंतर डांगर बुद्रुक नंतर जानवे ह्या सगळ्या गावावरून होत आता माझी बस अमळनेर बस स्टैंड वर दुपारी 3:20 वाजता पोहोचली.

अमळनेर बस स्टँड हा जळगाव जिल्हा अंतर्गत मोडतो. ह्या बस स्टँडवर एकूण आठ फलाट दिलेले आहेत.

इथून पुढे माझी बस चोपडा गाठण्यासाठी परत एकदा हायवे वरून धावू लागली. अमळनेर ते चोपडा चा अंतर 38 किलोमीटर आहे.

अमळनेर ह्या ठिकाणी बोरी नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे अमळनेर चोपडा हायवे वरून धावत माझी बस आता नांदरी ह्या ठिकाणावरून होत पातोंडा नंतर सावखेडा इथून पुढे तापी नदीच्या पूल पार करत निमगव्हाण ह्या ठिकाणी पोहोचत माझी बस आता चोपडा बस स्टैंड मध्ये फ्लॅट क्रमांक पाच वर दुपारी 4:30 वाजता पोहोचली.

चोपडा बस स्टँड वरून माझी बस पुढे यावल गाठण्यासाठी सुरू झाली. चोपडा ते यावल चा अंतर कमीत कमी 45 किलोमीटरचा आहे.

अंकलेश्वर बुरहानपुर हायवेवरून प्रवास करत पुढे अडावद बस स्टैंड वर संध्याकाळी 5:10 वाजता पोहोचली. इथून यावल चा अंतर जवळपास 30 किलोमीटरचा आहे. अडावद बस स्टॅन्ड ला एकूण तीन फलाट दिलेले आहे.

धानोरा नंतर किनगाव इथून पुढे माझी बस आता यावल बस स्टैंड वर संध्याकाळी 6:00 वाजता पोहोचली. यावल बस स्टॅन्ड ला एकूण तीन फलट दिलेले आहेत.

यावल पासून रावेर जवळपास 40 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

Thane To Raver Final Destination

अंकलेश्वर बुऱ्हानपूर हायवेवरून परत एकदा प्रवास करत फैजपूर बस स्टँडवर संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचत पुढे साव्हाडा बस स्टैंड वर संध्याकाळी 6:45 वाजता पोहोचल्यानंतर पुढे परत एकदा हायवे वरून प्रवास करत माझी बस शेवटी रावेर बस स्टैंड वर संध्याकाळी 7:30 वाजता पोहोचली

अशाप्रकारे Thane To Raver चा प्रवास पूर्ण झाला.

What is the distance from Thane To Raver?

550 kilometers

What is the minimum bus ticket fare from Thane To Raver?

850 रुपये

Leave a Comment