नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या Jalgaon to Shrigonda ह्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.
ह्या बसचा मार्ग जळगाव पासून सिल्लोड नंतर छत्रपती संभाजीनगर नंतर अहमदनगर आणि श्रीगोंदा अशाप्रकारे आहे.ह्या गाडीचा वेळ सकाळी सहा वाजताचा आहे. ही गाडी श्रीगोंदा आगारातली आहे.
Table of Contents
Jalgaon To Shrigonda Journey Starts
बरोबर सहा वाजता माझी गाडी जळगाव बस स्टँडवरून आपला टप्पा गाठण्यासाठी निघाली. मार्गावरील चिंचोली नंतर नेरी नंतर पाळधी तसेच पुढे पाहूर नंतर वाकोड इथून पुढे फर्दापूर करत पुढे अजिंठा घाट पार केल्यानंतर अजिंठा ठिकाणावरून होत बाळापुर नंतर गोळेगाव तसेच पुढे सिल्लोड बस स्टैंड वर फलट क्रमांक एकवर सकाळी 7:45 वाजता पोहोचली. सिल्लोड बस स्टैंड वर एकूण 12 फलट दिलेले आहेत.
आतापर्यंत 92 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता. इथून पुढे आता माझी गाडी छत्रपती संभाजीनगर च्या दिशेने निघाली.
Jalgaon To Shrigonda MSRTC Bus Timetable
जळगाव ते श्रीगोंदा जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात
| From | To | Timings | Routes |
| Jalgaon | Shrigonda | 06:00 | Sillod, Chatrapati Sambhaji Nagar (Aurangabad), Ahilyanagar (Ahmednagar) |
Jalgaon to Shrigonda Distance

जळगाव ते श्रीगोंदा हा जवळपास 350 किलोमीटरचा प्रवास आहे.बस स्टँड वरून छत्रपती संभाजी नगरचा अंतर 65 किलोमीटरचा आहे. छत्रपती संभाजीनगर च्या दिशेने धावत असताना आळंद या ठिकाणावरून होत नंतर फुलंब्री बस स्टँडवर सकाळी 8:45 वाजता पोहोचल्यानंतर आपल्या पुढचा प्रवास करण्यासाठी परत एकदा रस्त्यावर धावली.
बराच काळ हायवेवर धावल्यानंतर चौका या ठिकाणावरून होत छत्रपती संभाजीनगर जवळ समृद्धी महामार्ग वरून पुढे छत्रपती संभाजी नगर बस स्टैंड वर 9:30 वाजता आली.
परत एकदा छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर हायवेवर धावत पुढे लिंबे जळगाव या ठिकाणावरून ढोरेगाव नंतर कायगाव या ठिकाणी गोदावरी नदीच्या वर बांधलेला पुलावरून होत नेवासा फाटा कडून होत पुढे थोड्याच अंतरावर हॉटेल शितल फॅमिली रेस्टॉरंट इथे जेवणासाठी सकाळी 11:00 वाजता थांबा घेते.
अहमदनगर पोहोचण्यासाठी जवळजवळ तासाभरांचा प्रवास शिल्लक राहिला होता . इथून अहमदनगर 45 किलोमीटरचा अंतरावर स्थित आहे.
जेवण झाल्यानंतर परत एकदा हायवेवर धावत घोडेगाव नंतर पांढरीचा पूल नंतर अहमदनगर बस स्टँड वर 12:30 वाजता पोहोचली.
छत्रपती संभाजी नगर वरून 115 किलोमीटरचा अंतर घाटात आता मी पोहोचलो होतो अहमदनगर बस स्टैंड वर. इथून श्रीगोंदा जवळपास 60 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता ज्याला कमीत कमी दीड ते दोन तास चा कालावधी लागला.
इथून पुढे अरणगाव या ठिकाणावरून होत पुढे अहमदनगर दौंड हायवे वर धावत खडकी इथून पुढे कोळगाव नंतर घारगाव तसेच पुढे पारगाव सुद्रिक फाटा इथून प्रवास करत पारगाव सुद्रिक या ठिकाणावरून होत पुढे शेवटी श्रीगोंदा बस स्टैंड वर दुपारी 2:00 वाजता पोहोचलो.
हा माझा प्रवास खानदेश ते मराठवाडा चा आठ तासांचा प्रवास होता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला याच्याबद्दल मला माहिती द्या आणि आपला मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद
FAQs
How Long Does It Take To Drive From Jalgaon To Shrigonda?
8 Hours
Which Bus Operator Offers The Cheapest Fare From Jalgaon To Shrigonda?
msrtc bus