How To Travel From Jalgaon To Mahad Bus Journey

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझा Jalgaon to Mahad ह्या  प्रवासाबद्दल माहिती देणार आहे .माझा Jalgaon to Mahad हा खानदेश ते कोकण अशा प्रकारे होता.

Jalgaon to Mahad Distance

Jalgaon to Mahad Distance

तर मित्रांनो Jalgaon to Mahad चा अंतर 536 किलोमीटर आहे. माझी ही गाडी Jalgaon to Mahad बोर मार्गे प्रवास केली.

सकाळची लवकर निघणारी ही बस होती मी 5:00 वाजताच जळगाव बस स्टैंड वर येऊन थांबलो होतो.पूर्णपणे अंधार होता अजून दिवस कुठे उजाडला नव्हता.

ह्या जळगाव बस स्टैंड वर जवळपास 16 फलाट दिलेले आहेत. ह्या जळगाव बस स्टॅन्ड ला दोन बाजू फलाट दिलेले आहे. पहिली बाजू एक ते आठ फलट आहेत आणि दुसरी बाजू 9 ते 16 अशाप्रकारे आहे. माझा ह्या गाडीचा मार्ग जळगाव पासून सिल्लोड नंतर छत्रपती संभाजी नगर अहमदनगर नंतर पुणे स्वारगेट तसेच भोर आणि शेवटी महाड अशा प्रकारे होता.

जळगाव बस स्टैंड वर लांब पल्याची गडांच्या येणं जाणं चालूच होता.ज्या गाडीचा मला आतापर्यंत वाट पाहत होतो ती आता माझ्या समोर होती.गाडीचे चालक आपला प्रवास सुरु करण्या पूर्वी काच पुसून घेतली.

आता मात्र 5:30 झाले होते हळूहळू मुकामी गाड्या सुरु होऊ लागल्या.जळगाव बस स्टैंड वर तुम्हाला मध्यप्रदेश राज्याच्या गाड्या पाहायला मिळतील.

Jalgaon To Mahad MSRTC Bus Timetable

जळगाव ते महाड जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात

From ToTimingsRoutes
JalgaonMahad6:00Sillod, Chhatrapati Sambhajinagar, Ahmednagar, Pune Swargate, Bhor

माझी गाडी फ्लॅट क्रमांक 7 वरून आपल्या पुढचा टप्पा गाठण्यासाठी आकाशवाणी सर्कल इकडून पुढे अजिंठा चौफुली कडून होत MIDC नंतर एअरपोर्ट नंतर उमाळे नंतर नेरी नंतर पाळधी नंतर पाहूर तसेच पुढे वाकोड इथून पुढे वाघूर नदी ओलांडून फरदापुर येथून पुढे अजिंठा लेणी कडून पुढे अजिंठा घाट पार करत अजिंठा शहरात दाखल झाली.

अजिंठा घाटाचा रस्ता सिंगल आहे त्यामुळे गाडी सावकाश चालवावी लागते.रस्ता मात्र नवीन बनवलंय असा वाटत होता.अजिंठा घाट खरंच बघण्या सरका आहे.

ह्या वेळी रस्त्यावर जास्त ट्राफिक वगेरे काही नव्हता इथून हळूहळू दिवस उजडू लागला.रस्ते आता बऱ्यापैकी ठळक दिसू लागली.

इथून पुढे अजिंठा नदी ओलांडून गोळेगाव नंतर सिल्लोड बस स्टँडवर फ्लॅट क्रमांक एक वरती आली. आतापर्यंत 92 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता.सिल्लोड बस स्टँडवर भरपूर गर्दी दिसली.ह्या सिल्लोड बस स्टँडवर गाडीचे रहदारी जास्त असल्या मुळे गाड्या नीट आपल्या फलाटावर लागत नाही.

इथून छत्रपती संभाजीनगर 65 किलोमीटरचा अंतरावर स्थित आहे. सिल्लोड बस स्टैंड वर बारा फलट दिलेले आहेत. आपला मार्गावरील दुसरा टप्पा म्हणजे छत्रपती संभाजी नगर होता.

सिल्लोड बस स्टॅन्ड वरून पुढे आळंद इथून होत फुलंब्री बस स्टैंड वर थोडा काळ थांबल्यानंतर आपल्या पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा धावायला सुरू करते .फुलंब्री बस स्टैंड फार छोटा असा बस स्टैंड आहे. बस स्टैंडचा आतला परिसर मातीचा आहे.

फुलंब्री बस स्टँड पासून संभाजीनगर 28 किलोमीटरचा अंतर आहे. येथून पुढे चौका ह्या  ठिकाणावरून पुढे बराच काळ धावल्यानंतर सावंगी इथून पुढे टी पॉइंट संभाजीनगर कडून होत दिल्ली दरवाजा करत तसेच पुढे छत्रपती संभाजी नगर बस स्टैंड वर सकाळी 9:18 वाजता पाहोचली.

छत्रपती संभाजी बस स्टँड वरून अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर 112 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. आतापर्यंत जळगावपासून छत्रपती संभाजी नगर पर्यंत 156 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता.छत्रपती संभाजी नगर बस स्टँडवर सुद्धा गर्दी बघायला मिळाली.

Jalgaon to Mahad MSRTC Bus Ticket Price

Jalgaon to Mahad हे जवळपास 850 रुपये तिकीट दर आहे. इथून अहमदनगर पोहोचण्यासाठी जवळपास साडेतीन तासांचा कालावधी लागला.

Chhatrapati Sambhaji Nagar शहरामध्ये महावीर चौक इथून होत धर्मापुर ह्या ठिकाणावरून पुढे वाळूज नंतर लिंबे गाव जळगाव ह्या  ठिकाणी असणारा टोल नाका पार करत पुढे डोळेगाव ह्या  ठिकाणी शिवना नदीच्या पुलावरून होत पुढे कायगाव इथे गोदावरी नदीच्या पुलावरून होत पुढे प्रवरासंगम नंतर किती संगम ह्या ठिकाणी असणारा टोल नाका पार करून पुढे नेवासा फाटा नंतर पुढे मिलीचिंचोरा जवळ हॉटेल धनश्री इथे सकाळी 11:00 वाजता जेवणासाठी थांबा घेते.

आतापर्यंत 227 किलोमीटरचा पल्ला पार झाला होता.हॉटेल धनश्री हा बरोबर रस्त्याच्या कडेला बांधलेला दिसतो.फार काही मोठा असा काही हॉटेल नाही.ह्या ठिकाणावरून अहील्यानगर तासाबाराचा प्रवास शिलक राहिला होता.अहील्यानगर इथून 46 Km चा अंतर होता.

तब्बल वीस पंचवीस मिनिटं जेवणासाठी थांबा घेतल्यानंतर आता माझी गाडी पुढचा प्रवास करायला सुरू करते. घोडेगाव ह्या ठिकाणावरून होत पुढे पंढरीचा पूल नंतर ट्राफिक मधून वाट काढत माझी बस तारकपूर अहमदनगर बस स्टँड वर दुपारी 12:00 वाजता पोहोचली.

आपला मार्ग वरील हा चौथा बस थांबा होता. ह्या बस स्टैंड वर एकूण 12 फलाट दिलेले आहेत. इथून पुणे 124 किलोमीटरचा अंतर आहे. हा अंतर गाठण्यासाठी मला कमीत कमी साडेतीन तासांचा कालावधी लागला.

तारकपूर अहमदनगर बस स्टँड वरून माझी बस अहमदनगर पुणे बस स्टँड वर पाहोचली .अहमदनगर पुणे बस स्टँड वर जबरदस्त गर्दी होती. बरेच प्रवाशी गाडी मध्ये चडले.

इथून पुढे माझी एसटी आपला पुढचा टप्पा पार करण्यासाठी परत एकदा रस्त्यावर धावत कामरगाव नंतर सुपा ह्या  ठिकाणी असणारा टोल नाका पार करत शिरूर येथे घोड नदी ओलांडून शिरूर बस स्टैंड वर पोहोचली.

शिरूर बस स्टँड वरून पुणे स्वारगेट 172 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता. माझ्या मार्गावरील हा पाचवा थांबा होता.शिरूर बस स्टँड नवीन आणि तसेच खूप मोठा होता.ह्या शिरूर बस स्टँडवर सुद्धा मला भरपूर प्रवाशी पाहायला मिळाले.आता पर्यंत रस्ते चांगलेच होते.

इथून पुढे कारेगाव ह्या  ठिकाणावरून होत शिक्रापूर इथून पुढे वेळू नदी ओलांडून पुढे कोरेगाव भीमा नदी च्या पुलावरून होत पुढे वाघोली नंतर पुणे शहरात शिवाजीनगर ह्या ठिकाणावरून होत माझ्या मार्गावरील सहावा बस स्टैंड वर म्हणजे स्वारगेट बस स्टैंड वर संध्याकाळी 4:30  वाजता पोहोचली.

आतापर्यंत 393 किलोमीटरचा टप्पा पार झाला होता. अजून 126 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता.दहा मिनिटं पुणे स्वारगेट बस स्टैंड वर थांबल्यानंतर आता माझी गाडी पुढचा टप्पा म्हणजे महाड साठी धावायला सुरू करते.

स्वारगेट बस स्टैंडवरून पुढे भरपूर ट्राफिक मधून वाट काढत माझी बस कात्रज घाट पार करत खेड शिवापूर येथे असणारा टोलनाका पार करून पुढे नसरापूर नंतर कापूरहोळ इथे भोर ब्रिज वरून प्रवास करत पुढे कासुर्डी नंतर नीरा नदीच्या पुलावरून होत माझी बस आता भोर बस स्टैंड वर 6:15 वाजता पोहोचली.भोर बस स्टैंड वर गाडी 10 मिनिटं थांबली.

भोर बस स्टँडवर जुन्या पद्धतीने बांधलेला आहे.फार छोटा असा बस स्टँड पाह्यला मिळतो.भोर बस स्टँडवरून महाड 75 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. भोर बस स्टैंड वर एकूण सहा फलाट दिलेले आहेत. आतापर्यंत 443 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता.

Jalgaon To Mahad Final Destination

येथून पुढे मला भरपूर झाडे आणि डोंगर पाहायला मिळाली.म्हणजेच कोंकण सुरु झालाय. हळूहळू अंधार पसरलं होता.मी आता आंबेघर येथे नीरा नदीच्या पुलावरून होत पुढे सांगवी तर्फ भोर नंतर निगुडघर नंतर वेणूपुरी नंतर हिरदोशी इथून पुढे देवघर पुलावरून होत पुढे अभेपुरी नंतर वरंधा घाटावरून प्रवास करत तसेच वरंधा शहरात धाखल होत बिरवाडी इथून पुढे शेवटी महाड बस स्टैंड वर माझी बस रात्री 9:00 वाजता पोहोचली.

अशाप्रकारे माझा Jalgaon to Mahad चा प्रवास पूर्ण झाला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद

FAQs

How Much Is Jalgaon To Mahad Msrtc Bus Ticket Price?

850 रुपये

What Is The Cost Of The Bus Ticket From Jalgaon To Mahad?

850 Rupees

What Is Jalgaon To Mahad Distance By Road?

536 किलोमीटर

What Are The Boarding Points From Jalgaon To Mahad?

जळगाव पासून सिल्लोड नंतर छत्रपती संभाजी नगर अहमदनगर नंतर पुणे स्वारगेट तसेच भोर आणि शेवटी महाड

Leave a Comment