नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगद्वारे माझा Dharmabad to Pandharpur या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
Table of Contents
What is the distance from Dharmabad to Pandharpur Distance by road?

धर्माबाद हा नांदेड जिल्हा अंतर्गत मोडतो. धर्माबाद ते पंढरपूर हा जवळपास 400 किलोमीटर होता.धर्माबाद बस स्टँडच्या आवारात जवळपास 300 मीटरच्या अंतरावर धर्माबाद रेल्वे स्टेशन सुद्धा पाहायला मिळेल.
या गाडीचा मार्ग धर्माबाद पासून बिलोली, नरसी, लातूर, तुळजापूर, सोलापूर आणि पंढरपूर अशाप्रकारे आहे. या गाडीमध्ये रिझर्वेशन ची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. तर ज्या प्रवाशांना लांबचा प्रवास करायचा असतो त्यांना रिझर्वेशन करून प्रवास करता येईल.
Dharmabad To Pandharpur MSRTC Bus Timetable
Dharmabad Bus Stand वरून Pandharpur जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात
| From | To | Timings | Routes |
| Dharmabad | Pandharpur | 10:30 | Biloli,Narsi, Mukhed, Latur, Tulajapur,Solapur |
या ठिकाणावरून तेलंगणा महाराष्ट्र सीमारेषा चार किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे.बरोबर 10:30 वाजता माझी गाडी पंढरपूर गाठण्यासाठी धर्माबाद बस स्टँडवरून निघाली. या गाडीचा नंबर MH 14 MH 1773 अशाप्रकारे होता. ही गाडी नांदेड विभागाची तसेच बिलोली आगाराची होती.
ही गाडी लातूर मार्गे सोलापूर इथून पुढे पंढरपूर जाते. इथून पुढे माझी गाडी आता धर्माबाद बस स्टॅन्ड वरून बिलोली ला जाते.
हायवे वरून धावत असताना बाभळी या ठिकाणावरून होत पुढे गोदावरी नदीच्या पुलावरून प्रवास करत शेळगाव नंतर कुंडलवाडी बस स्टैंड वर सकाळी 11:30 वाजता पोहोचत पुढे बिलोली बस स्टँडवर सकाळी 11:45 वाजता पोहोचली.
धर्माबाद पासून बिलोली जवळपास 22 किलोमीटरचा अंतर पूर्ण झाला होता. बिलोली बस स्टँडवरून आता माझी गाडी नरसी च्या दिशेने धावू लागली. बिलोली नरसी हायवे वरून धावत पाच पिंपळी या गावावरून होत पुढे नरसी बस स्टैंड वर दुपारी 12:15 वाजता पोहोचली. धर्माबाद ते नरसी हा जवळपास 42 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास दीड तासांचा कालावधी लागला.
नरसी बस स्टँड वरून पुढे आता माझी गाडी मुखेडच्या दिशेने धावत नरसी मुखेड हायवे वरून प्रवास करत पुढे गडगा या ठिकाणावरून होत रातोळी नंतर मुखेड बस स्टैंड वर दुपारी 1:00 वाजता पोहोचली.
मुखेड बस स्टँड वरून माझी गाडी आता मुखेड शिरूर ताजबंद पुढे जांब नंतर हाडोळती नंतर शिरूर ताजबंद बस स्टैंड वर दुपारी 2:20 मिनिटांवर पोहोचली. शिरूर ताजबंद हा लातूर जिल्हा अंतर्गत मोडतो.
सोलापूर तुळजापूर हायवे वरून धावत पुढे चापोली नंतर चाकूर बस स्टैंड वर दुपारी 2:45 वाजता पोहोचत पुढे माझी बस आता लातूर बस स्टैंड क्रमांक एक वर दुपारी 3:40 मिनिटांवर पोहोचली.
Dharmabad To Pandharpur Ticket Price
Dharmabad To Pandharpur पर्यंतचा तिकीट भाड जवळपास 650 रुपये होता. जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे याची नोंद घ्यावी. आतापर्यंत धर्माबाद पासून लातूर 185 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता.इथून पंढरपूर 190 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.
लातूर बस स्टँड क्रमांक एक वरून माझी बस 20 मिनिटांचा प्रवास करत लातूर बस स्टँड क्रमांक दोन वर दुपारी 4:00 वाजता फलाट क्रमांक पाचवर पोहोचली.
इथून पुढे औसा बस स्टैंड वर दुपारी 4:30 वाजता पोहोचत पुढे नागपूर तुळजापूर हायवेवरून धावत उजनी इथे संध्याकाळी 5:00 वाजता जेवणासाठी थांबा घेते. या ठिकाणावरून पंढरपूर तीन तासांचा कालावधी लागला.
उजनी इथून पुढे तुळजापूर बस स्टैंड वर संध्याकाळी 5:15 वाजता पोहोचली. इथून पुढे तुळजापूर घाट पार करत पुढे धुळे सोलापूर हायवे वरून धावत शेवटी माझी गाडी आता सोलापूर बस स्टैंड वर संध्याकाळी 6:00 वाजता पोहोचली.
इथून पुढे दोन तासांचा अंतरावर असणारा पंढरपूर गाठण्यासाठी माझी गाडी आता मोहोळ मार्गे धावू लागले. आतापर्यंत धर्माबाद पासून आठ तासांचा हा प्रवास पूर्ण झाला होता.
सोलापूर पुणे हायवे वरून धावत माझी बस आता मोहोळ बस स्टैंड वर रात्री 8:00 वाजता पोहोचत पुढे सोलापूर पंढरपूर हायवेवर प्रवास करत चंद्रभागा नदीच्या पुलावरून होत माझी बस आता पंढरपूर बस स्टैंड वर रात्री 8:45 वाजता पोहोचली.
Dharmabad To Pandharpur Final Destination
अशाप्रकारे माझा धर्माबाद ते पंढरपूरचा हा प्रवास पूर्ण झाला. हीच गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता पंढरपूर पासून धर्माबाद चा प्रवास करते.
तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला याच्याबद्दल मला माहिती द्या आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद
FAQs
How much is Dharmabad to Pandharpur msrtc bus ticket price?
650 Rupees
What is the distance from Dharmabad to Pandharpur Distance by road?
400 Km