How To Travel From Dhule To Solapur By MSRTC Bus

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे मी केलेला Dhule To Solapur शिर्डी मार्गे ह्या मार्गावरील प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.

Dhule To Solapur Distance By MSRTC Bus

Dhule To Pandharpur Distance

तर मी आज धुळे मध्यवर्ती बस स्टैंड वर माझ्या बसची वाट पाहत थांबलो होतो. ज्या गाडीने मी प्रवास करणार होतो ती धुळे आगारातली होती. ही गाडी कायम रिझर्वेशन गाडी असते. Dhule To Solapur जवळपास 450 किलोमीटरचा अंतर आहे.

What Are The Boarding Points From Dhule To Solapur?

ह्या गाडीचा मार्ग धुळे पासून मालेगाव, मनमाड, अहमदनगर आणि शेवटी सोलापूर अशा प्रकारे होता. ह्या गाडीचा नंबर MH 20 GC 3557 अशाप्रकारे होता.

तर माझी बस धुळे बस स्टॅन्ड वरून बरोबर संध्याकाळी 6:30 वाजता आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी सुरू झाली. धुळे शहरातून बाहेर पडत माझी बस आता धुळे माळेगाव हायवे वरून धावत आर्वी इथून पुढे झोडगे नंतर मालेगाव बस स्टँड वर फलट क्रमांक सात वर रात्री 8:00 वाजता पोहोचली.

Dhule To Solapur MSRTC Bus Timetable

धुळे ते सोलापूर जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात

From ToTimingsRoutes
Dhule Solapur6:30Malegaon, Manmad,Shirdi, Ahmednagar,Mirajgaon,Karmala,Tembhurni

फलट क्रमांक सात वरून झोडगे, आर्वी, धुळे, अमळनेर, ह्यावल, रावेर, ब्रह्मणपुर, नरडाणा, शिरपूर सेंधवा आणि इंदोर ह्या मार्गावर जाणारे गाड्या सोडतात. धुळे ते माळेगाव हा जवळपास 50 किलोमीटरचा अंतर पूर्ण झाला होता.

आता माझी बस मालेगाव बस स्टँड वरून शिर्डीच्या दिशेने धावत चालली हा अंतर जवळपास 95 किलोमीटरचा अंतर होता. इथून पुढे माझी बस मालेगाव मनमाड हायवेवरून धावत चोंडी घाट पार करत पुढे मनमाड बस स्टैंड वर रात्री 9:00 वाजता पोहोचली. मनमाड बस स्टँड वरून शिर्डी हा 58 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

मनमाड अहिल्यानगर हायवे वरून धावत पुढे अर्धा तास प्रवास करत रात्री 9:30 वाजता सावरगाव ह्या ठिकाणी हॉटेल मानस येथे जेवणासाठी थांबा करते.

How Much Is Dhule To Solapur Msrtc Bus Ticket Price?

Dhule To Solapur तिकीट दर 700 रुपये रुपये होता जे कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे. इथून शिर्डी 40 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

इथून पुढे माझी बस परत एकदा हायवे वरून धावत येवला बस स्टैंड वर रात्री 10:15 वाजता पोहोचत पुढे कोपरगाव बस स्टैंड वर रात्री 10:45 वाजता फलाट क्रमांक पाचवर पोहोचत परत एकदा हायवेवर धावत शिर्डी बस स्टँडवर 11:15 वाजता पोहोचली.

आतापर्यंत धुळे पासून 150 किलोमीटरचा अंतर पार झाला होता. इथून अहमदनगर हा 85 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. आतापर्यंत धुळे, नाशिक, अहमदनगर ह्या सगळ्या जिल्ह्यामधून माझा प्रवास झाला होता.

शिर्डी बस स्टँडवरून पुढे आता माझी बस भाबळेश्वर इथून पुढे राहुरी, नंतर अहिल्यानगर तारकपूर बस स्टैंड वर रात्री 1:15 वाजता पोहोचली. तारकपूर बस स्टैंड वर ह्या गाडीचे चालक आणि वाहक यांची बदली झाली. इथून सोलापूर जवळपास 225 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

तारकपूर बस स्टँडवरून पुढे आता माझी बस अहील्यानगर सोलापूर हायवे वरून धावत रुई छतिशी इथून पुढे आता मिरजगाव ह्या ठिकाणी 2:30 वाजता पोहोचत पुढे करमाळा ह्या ठिकाणी 3:30 वाजता पोहोचल्यानंतर पुढे जेऊर ह्या ठिकाणावरून होत तसेच बराच काळ धावत कंदर तसेच पुढे टेंभुर्णी बस स्टैंड वर सकाळी 4:15 वाजता पोहोचली.

आतापर्यंत जवळपास धुळे पासून जवळजवळ 400 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता इथून पुढे जवळ जवळ 88 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता.

इथून पुढे परत एकदा सोलापूर पुणे हायवे वरून धावत मोडनिंब ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे मोहोळ इथून पुढे हायवे वरून प्रवास करत माझी बस आता सोलापूर बस स्टैंड वर सकाळी 6:00 वाजता पोहोचली.

Dhule To Solapur Final Destination

तर अशाप्रकारे धुळे ते सोलापूर हा जवळपास 500 किलोमीटरचा आणि 11 तासांचा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

How Long Does It Take To Drive From Dhule To Solapur?

11 Hours

Leave a Comment