How To Travel From Alibag To Pandharpur By MSRTC Bus

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Alibag To Pandharpur ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

Alibag To Pandharpur Distance By MSRTC Bus

Alibag To Pandharpur

अलिबाग बस स्टँड हा रायगड विभाग अंतर्गत मोडतो. माझा Alibag To Pandharpur हा जवळजवळ 450 किलोमीटरचा प्रवास ठरला. अलिबाग हा महाराष्ट्रातील मिनी गोवा समजलं जातं. अलिबाग मध्ये पर्यटन स्थळ आणि किल्ले भरपूर आहेत.

तर बरोबर 10:15 वाजता माझी बस अलिबाग बस स्टँडवरून बाहेर पडली. अलिबाग बस स्टँड ला दोन ठिकाणी फलाट दिलेले आहेत. एका बाजूला फलट एक ते पाच पर्यंत आणि दुसरी बाजू एक ते सात पर्यंत.

Alibag To Pandharpur MSRTC Bus Timetable

अलिबाग ते पंढरपूर जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात

From ToTimingsRoutes
Alibag Pandharpur 10:15 Pen, Khopoli, Lonavala, Nigadi, Pune Pimpri-Chinchwad, Pune Shivaji Nagar Wakdewadi, Saswad, Jejuri, Nira, Lonand, Phaltan, Natepute, Malshiras

Alibag to Pandharpur Ticket Price

Alibag To Pandharpur तिकीट दर जवळपास 530 रुपये होता जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.

अलिबाग ते पंढरपूर चा मार्ग अलिबाग पासून लोणावळा, स्वारगेट, जेजुरी, फलटण आणि शेवटी पंढरपूर अशा प्रकारे होता.

ही गाडी  रिझर्वेशन गाडी आहे.अलिबाग शहरातून बाहेर पडत अलिबाग पेन हायवे वरून धावत तळवली ह्या ठिकाणावरून होत पुढे कर्लीखंड गोठेघर ह्या ठिकाणावरून पुढे पेझारी पुढे वढखल ह्या ठिकाणी आंबा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे थोडाच अंतरावर वढखल बस स्टैंड वर सकाळी 11:15 वाजता माझी लाल परी पोहोचली.

इथून पुढे परत एकदा धावत पेन बस स्टैंड वर सकाळी 11:30 वाजता पोहोचली येथून पुढे माझी बस आता पुणे स्वारगेटच्या दिशेने धावू लागले.

तसेच पुढे माझी बस पेन खोपोली हायवे वरून धावत कामार्लि ह्या ठिकाणावरून होत पुढे बराच काळ प्रवास केल्यानंतर रानसई ह्या ठिकाणावरून पुढे पाली फाटा कडून पुढे माझी बस आता खोपोली बस स्टैंड वर दुपारी 12:30 वाजता पोहोचली.

इथून पुढे माझी बस खंडाळा घाट पार करत तसेच खंडाळा बोगदामधून होत पुढे अलिबाग पासून 76 किलोमीटरचा अंतर पार करत माझी बस आता लोणावळा बस स्टँडवर दुपारी 1:45 वाजता पोहोचली.

लोणावळा हा पुणे विभाग अंतर्गत मोडतो. लोणावळा बस स्टँडवरून पुढे आता माझी गाडी पुणे स्वारगेटच्या दिशेने जुना मुंबई पुणे हायवे वरून धावत पुढे कामशेत नंतर तळेगाव दाभाडे तसेच पिंपरी चिंचवड बस स्टैंड वर फलाट क्रमांक नऊ येथे दुपारी 3:40 वाजता पोहोचली इथून पुढे आता माझी गाडी 15 किलोमीटरच्या अंतरावर असणारा पुणे स्वारगेट बस स्टँड दिशेने धावत चालली.

तर माझी गाडी पुणे शिवाजीनगर बस स्टँड कडून पुढे पुणे स्वारगेट बस स्टँडवर 4:45 वाजता पोहोचली. पुणे स्वारगेट पासून पंढरपूर हा जवळपास 211 किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी शिल्लक राहिला होता.

पुणे स्वारगेट बस स्टँड वर वेगवेगळ्या ठिकाणी फलट दिलेल्या आहेत. एकूण 29 फलाट पुणे स्वारगेट बस स्टैंड वर तुम्हाला पाहायला मिळतील.

पुणे स्वारगेट वरून आता माझी गाडी आहे जेजुरीच्या दिशेने धावत वडकी ह्या गावावरून होत पुढे ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्ग पंढरपूर हायवे वर धावत तसेच पुढे दिवेघाट पार करत माझी बस आता सासवड बस स्टैंड वर संध्याकाळी 6:00 वाजता पोहोचत पुढे परत एकदा हायवेवर धावत जेजुरी बस स्टैंड वर संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचली.

जेजुरी बस स्टँड वरून पुढे आता माझी गाडी जेजुरी फलटण हायवेवर धावत निरा बस स्टँड वर संध्याकाळी 7:15 वाजता छोटासा थांबा घेत पुढे लोणंद बस स्टँड वर संध्याकाळी 7:30 वाजता पोहोचत परत एकदा हायवेवर धावत माझी बास आता फलटण बस स्टँडवर रात्री 8:15 वाजता पोहोचली.

फलटण बस स्टँडवरून माझी बस आता फलटण पंढरपूर हायवेवर धावत पुढे मोरोची ह्या ठिकाणी हॉटेल गारवामध्ये जेवणासाठी बरोबर रात्री 9:00 वाजता थांबा करते.

अलिबाग ते इथपर्यंत माझी गाडी रायगड विभाग, पुणे विभाग, सातारा विभाग आणि सोलापूर विभाग ह्या सगळ्या विभागामधून माझा प्रवास झाला होता.

Alibag to Pandharpur Final Destination

बराच काळ हायवेवर धावत आता माझी बस नातेपुते बस स्टैंड वर रात्री 9:30 वाजता पोहोचत पुढे माळशिरस बस स्टँडवर रात्री 10:00 वाजता पोहोचत शेवटी माझी बस आता पंढरपूर बस स्टँडवर रात्री 11:00 वाजता पोहोचली.

FAQs

How Long Does It Take To Drive From Alibag To Pandharpur?

9 Hours

What Are The Boarding Points From Alibag To Pandharpur?

अलिबाग पासून लोणावळा, स्वारगेट, जेजुरी, फलटण आणि शेवटी पंढरपूर

What Is Alibag To Pandharpur Distance By Road?

450 Km

Leave a Comment