How To Travel From Nanded To Gadachiroli

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Nanded To Gadachiroli ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

Nanded To Gadachiroli Distance

Nanded To Gadachiroli Distance

Nanded To Gadachiroli चा अंतर जवळपास 500 किलोमीटर आहे .ही गाडी गडचिरोली विभागाची तसेच गडचिरोली आगाराची होती. ह्या गाडीचा मार्ग नांदेड पासून उमरखेड, माहूर, यवतमाळ, वनी, अरोरा, चंद्रपूर, मोल, आणि शेवटी गडचिरोली अशाप्रकारे होता .

Nanded To Gadachiroli MSRTC Bus Timetable

Nanded Bus Stand वरून Gadachiroli जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.

FromToTimingsRoutes
Nanded Gadchiroli 07:00Ardhapur, Waranga Fata, Hadgaon, Umarkhed, Mahur, Arni, Yavatmal, Warora, Chandrapur, Mul,

नांदेड बस स्टैंडवर मला सकाळी सकाळी गर्दी पाहायला मिळाली.फलट क्रमांक नऊ वरून माझी गाडी सकाळी 7:00 वाजता नांदेड बस स्टॅन्ड पासून निघाली.

अर्धापूर ह्या ठिकाणावरून होत पुढे नांदेड हिंगोली हायवे वरून प्रवास करत तसेच वारंगा फाटा इकडून उजव्या बाजूला वळत पुढे नांदेड हदगाव हायवेवरून धावत माझी एसटी आता हदगाव बस स्टैंड वर सकाळी 8:20 वाजता पोहोचली.पावसाळी वातावरण होता आणि हदगाव बस स्टैंडवर जागी जागी पाणी साठला होता.ह्या बस स्टैंडचा बांधकाम जुनाच आहे.

नांदेड पासून 65 किलोमीटरचा अंतर गाठत मी आता पोहोचलो होतो हदगाव बस स्टैंड वर. हादगाव हा नांदेड विभागाअंतर्गत मोडतो. हदगाव बस स्टॅन्ड ला सहा फलट दिलेले आहेत.

इथून पुढे उमरखेड, माहूर ,अरणी आणि यवतमाळ ह्या मार्गे माझी बस आता धावू लागली.

चिंचोली ह्या ठिकाणी पैनगंगा नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस उमरखेड बस स्टैंड वर सकाळी 8:45 वाजता पोहोचली.उमरखेड बस स्टैंड कडून पुढे सिंगल रस्त्य्वरून धावत माझी बस इथून पुढे अमनपूर नंतर नांदगव्हाण नंतर महागाव बस स्टैंड वर सकाळी 9:30 वाजता पाहोचली.पावसामुळे रस्त्याची अवस्ता खराब होती.

परत एकदा माझी बस पूस नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे खडका इथे नागपूर तुळजापूर हायवे लगत असणारा हॉटेल शिवतेज ह्या ठिकाणी सकाळी 9:45 वाजता जेवणासाठी थांबा घेते.पावसाळी वातावरण मध्ये भजी खायाची खूप इच्छा झाला म्हणून एक राईस प्लेट आणि एक प्लेट भजी घेतली.

ह्या ठिकाणी भजी थोडी वेगळी असते.बारके भजी खायाला मिळेल.एक राईस प्लेट,एक प्लेट भजी आणि एक पाण्याची बाटली धरून एकूण खर्च 80 रुपये आलं.नांदेड वरून जी गाडी भरली होती ती हदगाव पर्यंत पाहायला मिळाली. हदगाव बस स्टॅन्डवरून आणखी भरपूर प्रवाशी गाडी चढले.

इथून पुढे परत एकदा माझी बास नागपूर तुळजापूर हायवे वरून प्रवास करत पुढे माहूर बस स्टैंड वर सकाळी 10:15 वाजता पोहोचली. माहूर बस स्टॅन्ड हा नांदेड विभागाअंतर्गत मोडतो. याच्या अगोदर माझी बस यवतमाळ विभागामध्ये होती.माहूर बस स्टॅन्डवर जितके उतरणारे होते तितकेच चढणारे पाहायला मिळाले.

माहूर ते यवतमाळ 78 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. इथून पुढे परत एकदा माझी बस हायवे वरून प्रवास करत पुढे अरणी बस स्टैंड वर सकाळी 11:00 वाजता पोहोचत आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा हायवेवरून प्रवास करत भांब ह्या ठिकाणी टोलनाका पार करत माझी बस यवतमाळ बस स्टैंड वर दुपारी 12:00 वाजता पोहोचली.यवतमाळ बस स्टैंड खूपच मोठा आहे.पण पावसाळी काळात मला आतल्या परिसर मध्ये पाणी साठलेला रस्ता पाहायला मिळाला.यवतमाळ बस स्टैंडवर अफाट गर्दी होती.

Nanded To Gadachiroli MSRTC Ticket Price

Nanded To Gadachiroli चा तिकीट दर जवळपास 800 रुपये आहे जे कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.

इथून पुढे माझी बस सिंगल यवतमाळ वाणी रस्त्यावरून धावत यरद इकडून होत पुढे जोडमोहा नंतर मेटीखेडा कडून पुढे थोड्याच अंतरावर हॉटेल हिंदुस्तानी ह्या ठिकाणी जेवणासाठी दुपारी 1:00 वाजता थांबा करते.ह्या ठिकाणी बरेच गाड्यांचा जेवण्यासाठी थांबा दिलेला आहे.यवतमाळ नंतर रस्ता थोडा खराब वाटला.

जेवण झाल्यानंतर पुढे मोहदा नंतर रुंझा नंतर कारंजा नंतर मोरेगाव इकडून पुढे माझी बस आता वनी बस स्टँड वर दुपारी 2:50 वाजता पोहोचली.

वनी बस स्टँडच्या लगत वनी डेपो दिलेला आहे.तर माझी गाडी वनी डेपो मध्ये डिझेल भरून झाल्यानंतर बस स्टॅन्ड चा फलट क्रमांक आठ वर येऊन थांबली. यवतमाळ पासून वनी बस स्टँड पर्यंत पूर्णपणे सिंगल रस्त्यावरून धावत आली.

वनी बस स्टँड ला दोन बाजू फलट दिलेले आहेत. ह्या वणी बस स्टॅन्ड वर १२ फलट दिलेले आहेत.ह्या वनी बस स्टँडवर सुद्धा मला लोकांची गर्दी पाहायला मिळाली.

आता माझी बस इथून पुढे वरोरा मार्गे चंद्रपूर गाठण्यासाठी परत एकदा हायवेवरून प्रवास करण्यास सुरू करते.

इथून वरोरा 28 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. वनी वरोरा हायवेवरून प्रवास करत कुचना नंतर शेंबाळ ह्या ठिकाणी टोलनाका पार करत माझी बस वरोरा बस स्टैंड वर दुपारी 3:45 वाजता पोहोचली.

इथून पुढे माझी बस वरोरा चंद्रपूर हायवे वरून प्रवास करत भद्रावती बस स्टॅन्ड वरून थोडा काळासाठी थांबा घेत पुढे परत एकदा धावत घोडपेठ नंतर पुढे चंद्रपूर जवळ हिराई नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस चंद्रपूर बस स्टैंड वर पलट क्रमांक एक वर दुपारी 4:45 वाजता पोहोचली. फ्लॅट क्रमांक एक वरून साकोली,गडचिरोली, गोंदिया, वडसा ,ह्या मार्गावर धावणारे गाड्या थांबतात.

चंद्रपूर बस स्टँडवरून 82 किलोमीटरच्या अंतरावर असणारा गडचिरोली गाठण्यासाठी परत एकदा हायवे वरून प्रवास करू लागली.चंद्रपूर बस स्टँडवर तेलंगा राज्याच्या हिरवे रंगाचे गाड्या दिसले.

इथून पुढे सिंगल रस्त्यावरून लोहारा गावामधून पुढे चिचपल्ली नंतर मुल बस स्टैंड वर संध्याकाळी 6:00 वाजता फलट क्रमांक चारवर पोहोचली.ह्या ठिकाणावरून गडचिरोली एक तासांचा रस्ता शिल्लक राहिला होता.हळू हळू संध्याकाळ होत आली होती. बसच्या बाहेर पहिल्या काहीच दिसणे बंद झाला.

मुल बस स्टैंडचा परिसर मला फार आवडला कारण आतला परिसर कॉंक्रीटचा होता तसेच मुल बस स्टैंडचा बांधकाम खूप मोठा आणि नवीन होता.आधुनिकीकरण झालेला असा एक बस स्टैंड पाहण्याचा योग मिळाला.मुल बस स्टैंडच्या समोरच मुल तलाव आहे.कदाचित ह्या बस स्टैंडचा नाव ह्या तळावरून ठेवला असावा.

इथून पुढे सावली नंतर व्याहाड नंतर पुढे गडचिरोली जवळ वैनगंगा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे गांधी चौक कडून होत माझी बस आता गडचिरोली बस स्टैंड वर संध्याकाळी 7:00 वाजता पोहोचली.गडचिरोली बस स्टैंडचा बांधकाम नवीन वाटला तसेच आतला परिसर पूर्णपणे कॉंक्रीटचा होता.

  • Distance: 500 km
  • Routes: Ardhapur, Waranga Fata, Hadgaon, Umarkhed, Mahur, Arni, Yavatmal, Warora, Chandrapur, Mul,
  • Timings: सकाळी 07:00 वाजता
  • Travel Duration: 12 Hrs
  • Ticket Price: Rs.800

अशाप्रकारे Nanded To Gadachiroli चा हा बारा तासांचा माझा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

What is Nanded to gadchiroli bus msrtc ticket price?

Rs.800

What is the distance between Nanded to gadchiroli ?

500 km

1 thought on “How To Travel From Nanded To Gadachiroli”

Leave a Comment