How To Travel From Chatrapati Sambhaji Nagar To Kalburgi

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Chatrapati Sambhaji Nagar To Kalburgi ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर अर्थात सिडको बस स्टँड वरून कलबुर्गी जाण्यासाठी दोन गाड्या दिलेले आहेत. पहिली गाडी सकाळी 6:00 वाजता आणि दुसरी गाडी सकाळी 7:00 वाजता सुटते आणि संध्याकाळी 6:15 वाजता आणि 7:15 वाजता सुटते.

छत्रपती संभाजीनगर सिडको बस स्टँडचा परिसर डांबरीचा होता आणि बस स्टँडवरचा छप्पर पत्र्याच्या होत्या.कॉंक्रीटचे बैठीकीसाठी बसण्याची खूप मोठी आणि लांबलचक प्रवाशांना करून दिली होती.ह्या ठिकाणी तुम्हाला नियंत्रण कक्ष दिसून येईल.

छत्रपती संभाजीनगर येथे दोन बस स्टॅन्ड दिलेले आहेत. पहिला बस स्टॅन्ड मध्यवर्ती बस स्टॅन्ड आणि दुसरा बस स्टॅन्ड सिडको बस स्टॅन्ड अशाप्रकारे आहे.

Chatrapati Sambhaji Nagar To Kalburgi MSRTC Bus Timetable

Chatrapati Sambhaji Nagar Bus Stand वरून Kalburgi जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.

FromToTimingsRoutes
Chatrapati Sambhaji NagarKalburgi5:45, 7:00, 18:00, 19:00,Shahagad, Gevrai, Beed, Manjarsumbha, Yermala, Yedshi, Dharashiv (Usmanabad), Tuljapur, Naldurg, Jalkot, Murum Fata, Umerga

तर मित्रांनो फलट क्रमांक दोन वरून माझी बस कलबुर्गी गाठण्यासाठी सकाळी 7:00 वाजता सुटली .ह्या फलाट वरून बीड, उस्मानाबाद, कलबुर्गी, विजापूर, तुळजापूर, गाणगापूर, बिदर, हुमनाबाद, परळी मुखेड, विहामांडवा आणि कचनेर ह्या मार्गावरील सगळ्या गाड्या सुटतात..

Chatrapati Sambhaji Nagar To Kalburgi Ticket Price

Chatrapati Sambhaji Nagar To Kalburgi चा तिकीट दर 700 रुपये आहे जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.हा माझा आंतरराज्य प्रवास होता. कलबुर्गी हा कर्नाटक राज्यातील एक शहर तसेच जिल्हा आहे.

Chatrapati Sambhaji Nagar To Kalburgi Distance

Chatrapati Sambhaji Nagar To Kalburgi Distance

Chatrapati Sambhaji Nagar To Kalburgi 500 किलोमीटरचा अंतर आहे.ज्या गाडीने मी प्रवास केला ती सकाळी 7:15 ची होती. ह्या गाडीचा मार्ग छत्रपती संभाजी नगर पासून बीड, धाराशिव, तुळजापूर, उमरगा आणि शेवटी कलबुर्गी असा होता.

छत्रपती संभाजी नगर सिडको ह्या बस स्टँड मधून बाहेर पडत माझी बस आता सोलापूर धुळे नॅशनल एक्सप्रेस हायवे वरून प्रवास करत चित्ते पिंपळगाव नंतर आडुळ नंतर पाचोड बस स्टैंड वर सकाळी 8:00 वाजता पोहोचली.

छत्रपती संभाजी नगर ते पाचोड हा 55 किलोमीटरचा अंतर आहे. ह्या पाचोड बस स्टैंड वर माझी बस जेवण्यासाठी थोडा काळ थांबा घेते.पाचोड बस स्टैंड वरचा उपहारगृह बद्दल इतकच सांगायचं आहे की थोडीशी स्वच्छता असली पाहिजे होती.

इथून पुढे परत एकदा हायवे वरून प्रवास करत माझी बस शहागड नंतर गोदावरी नदीच्या पूल ओलांडून बीड जिल्हा मध्ये दाखल झाली.बराच काळ हायवेवर प्रवास केल्यानंतर माझी गाडी आता गेवराई बस स्टैंड वर सकाळी 9:00 वाजता पोहोचली.

हायवे वरून प्रवास करत पारगाव जप्ती ह्या ठिकाणावरून होत माझी बस आता बीड बस स्टैंड वर सकाळी 10:00 वाजता पोहोचली.बीड बस स्टैंड वर गर्दी भरपूर होती.ह्या ठिकाणी गाडी बरेच प्रवाशी चढले.छत्रपती संभाजीनगर सिडको बस स्टँड वरून आता पर्यंत गाडी गर्दी होतीच.

इथून धाराशिव 116 किलोमीटरचा अंतरावर स्थित आहे. बीड धाराशिव हायवे वरून प्रवास करत असताना पाली ह्या ठिकाणावरून होत माझी बास आता मांजरसुंबा बस स्टैंड वर सकाळी 10:45 वाजता पोहोचली.मांजरसुंबा बस स्टैंडचा आतला परिसर मातीचा आहे.हा बस स्टैंड खूप छोटा आहे.

परत एकदा हायवेवरून प्रवास करत माझी बस छोटासा चौसाळा बस स्टैंड वर 11:00 वाजता पोहोचत पुढे पारगाव नंतर सरमकुंडी फाटा तसेच तेरखेडा नंतर येरमाळा बस स्टँडवर 11:45 वाजता पाहोचली. येरमाळा बस स्टँडचा बांधकाम मोकळा आहे.येरमाळा बस स्टँडच्या दोनी बाजू गाड्या उभे होऊ शकतात.

पुढे परत एकदा माझी बस येडशी ह्या ठिकाणी हॉटेल कालिका येथे दुपारी 12:00 वाजता जेवणासाठी माझी बस कमीत कमी वीस मिनिटांचा थांबा घेते.पारगाव नंतर धाराशिव जिल्हामधून माझा प्रवास झाला.इथे एक पुरी भाजी एक चहा आणि पाण्याची बाटली ह्याचा एकूण खर्च 90 रुपये होता.

ह्या ठिकाणावरून धाराशिव 22 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.ह्या ठिकाणावरून गुलबर्गा किंवा कलबुर्गी 200 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

येथून पुढे माझी बस आता येडशी बस स्टैंड वर दुपारी 12:45 वाजता पोहोचल्यानंतर परत एकदा हायवे वरून प्रवास करत माझी बस आता धाराशिव बस स्टैंड वर दुपारी 1:15 वाजता पोहोचली.धाराशिव बस स्टैंडचा रुंदीकरण करण्याचा काम झालेला आहे.उस्मानाबाद बस स्टैंड हा नाव बदलून धाराशिव बस स्टैंड करण्यात आलेला आहे.इथे भरपूर गर्दी दिसली.

धाराशिव बस स्टैंड वर माझी बस डिझेल भरण्याचा काम झाल्यानंतर पुढे तुळजापूर उमरगा आणि शेवटी कलबुर्गी ह्या मार्गे धावायला सुरू करते.

धाराशिव बस स्टैंड वर गाडीचे वाहक आणि चालक यांची इथे बदली झाली.तर मित्रांनो तुळजापूर धाराशिव हायवे वरून प्रवास करत माझी बस तुळजापूर बस स्टैंड वर दुपारी 2:00 वाजता पोहोचली.

इथून पुढे तुळजापूर उमरगा हायवेवरून धावत नळदुर्ग बस स्टैंड वर दुपारी 2:45 वाजता पोहोचत पुढे जळकोट नंतर येणेगुर नंतर उमरगा बस स्टैंड वर दुपारी 4:00 वाजता पोहोचली.

तुळजापूर पासून 72 किलोमीटर अंतर गाठत मी आता सिंगल रस्त्यावरून प्रवास करत उमरगा बस स्टैंड वर पोहोचलो होतो.उमरगा हा धाराशिव जिल्हा अंतर्गत मोडतो.

उमरगा बस स्टँड पासून कलबुर्गी 78 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास दोन तासांचा कालावधी लागतो.

परत एकदा उमरगा आळंद हायवे वरून प्रवास करत मी आता गुंजोटी ह्या ठिकाणावरून होत पुढे कसगी नंतर कर्नाटक महाराष्ट्र सीम पार करत माझी बस आळंद बस स्टैंड वर संध्याकाळी 5:00 वाजता पोहोचली.आळंद बस स्टैंडचा परिसर खूपच मोटा आहे.हा आळंद बस स्टैंड कर्नाटका राज्य अंतर्गत मोडतो.

ह्या ठिकाणावरून कलबुर्गी 43 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास दीड तासांचा कालावधी लागतो.

छत्रपती संभाजीनगर ते कलबुर्गी Final Destination

आळंद कलबुर्गी मार्गावरून धावत माझी बस कोडल हंगरगा नंतर कडघंची नंतर पट्टना ह्या ठिकाणी टोलनाका पार करत माझी बस आता कलबुर्गी येथे बसवेश्वर सर्कल इकडून होत पुढे कलबुर्गी बस स्टैंड वर संध्याकाळी 7: 00वाजता पोहोचली. हीच गाडी दुसऱ्याच दिवशी सकाळी 7:15 वाजता कलबुर्गी वरून निघते.

  • Distance: 500 Km
  • Routes: Shahagad, Gevrai, Beed, Manjarsumbha, Yermala, Yedshi, Dharashiv (Usmanabad), Tuljapur, Naldurg, Jalkot, Murum Fata, Umerga
  • Timings: 5:45, 7:00, 18:00, 19:00,
  • Travel Duration: 14 Hours
  • Bus Ticket Price MSRTC: 700 रुपये

अशाप्रकारे माझा छत्रपती संभाजीनगर ते कलबुर्गीचा हा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

Which bus operator offers the cheapest fare from Chatrapati Sambhaji Nagar To Kalburgi?

msrtcbus

How long does it take to drive from Chatrapati Sambhaji Nagar To Kalburgi?

13-14 Hours

What is Chatrapati Sambhaji Nagar To Kalburgi Distance by road?

500 Km

Leave a Comment