How To Travel From Shirdi To Ichalkaranji By MSRTC

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगमध्ये माझा Shirdi To Ichalkaranji  ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.

तर आलो होतो शिर्डी बस स्टँडवर सकाळी 5:30 वाजता.तसं आता ह्या वेळी इतकी काही गर्दी नाही दिसली पण हा बस स्टँड दिवसा असा फार गजबजलेला असतो.ह्या बस स्टँडवरून लांब पल्याचे भरपूर गाड्या सुटतात.महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा बस स्टँड मधला एक असा शिर्डी बस स्टँड.

ह्या बस स्टँडवर तुम्हाला वेगवेगळ्या राज्याचे गाड्या दिसतील जसे कि मध्यप्रदेश राज्य,कर्नाटका राज्य आणि गुजरात राज्य. तर तुम्ही अंदाज लाऊ शकता कि हा बस स्टँड किती महत्व ठेवतो.

गाडी लागयला अजून बराच वेळा होता म्हणून विचार केला चला काहीतरी खाऊन घेऊ.बस स्टँडच्या बाहेर एका रांगेने भरपूर हॉटेल दिसतील.आतापर्यंत बराचपैकी दिवस उजाडला होता आणि शिर्डी बस स्टँडवरचं सगळे ठळक दिसू लागला होता.

Shirdi Bus Stand  इथून मला इचलकरंजी जाण्यासाठी गाडी मिळाली. ह्या  गाडीचा मार्ग शिर्डी पासून राहुरी, अहमदनगर,शिरूर,पुणे स्वारगेट,सातारा,कराड आणि शेवटी इचलकरंजी अशा प्रकारे होता.

बरोबर सकाळी 7:00 वाजता माझी गाडी शिर्डी Bus Stand  वरून आपला प्रवास करण्यासाठी निघाली.ह्या गाडी मध्ये mobile charging करण्यासाठी charging point दिलेला आहे जे तुम्हाला प्रत्येक सीटच्या बाजू आहे.पण समस्या आहे कि आपला mobile लवकर charge नाही होत.

Shirdi To Ichalkaranji MSRTC Bus Timetable

शिर्डी ते इचलकरंजी जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात

From ToTimingsRoutes
Shirdi Ichalkaranji 4:30, 7:00 Rahuri, Ahmednagar, Shirur, Pune Shivaji Nagar Wakdewadi, Pune Swargate, Satara, Karad,Hatkanangale,

Shirdi To Ichalkaranji Ticket Price

Shirdi To Ichalkaranji  MSRTC बस द्वारे तिकीटचा भाडं 650 रुपये होता. हे भाडं कालांतराने कमी किंवा जास्त होऊ शकतं.

Shirdi To Ichalkaranji Distance By MSRTC Bus

Shirdi To Ichalkaranji Distance

तसेच Shirdi To Ichalkaranji  चा अंतर 435 किलोमीटर अशा प्रकारे आहे जवळपास हा नऊ तासांचा प्रवास ठरला.

हायवेवर धावत असताना माझी गाडी बाबळेश्वर ह्या ठिकाणावरून पुढे कोल्हार बुद्रुक नंतर प्रवरा नदीच्या पुलावरून प्रवास करत आता माझी गाडी कोल्हार खुर्द ह्या ठिकाणी पोहोचली.

अशाच प्रकारे राहुरी फॅक्टरी कडून होत तसेच Rahuri Bus Stand  वर 8:15 वाजता पोहोचली. राहुरी हा माझ्या मार्गावरील पहिला टप्पा होता.Shirdi to Rahuri पर्यंतचा रस्ता मस्त होता.राहुरी बस स्टँडवर दोन्ही बाजू फलाट दिलेले आहते.बस स्टँडचा शेड पत्र्याच्या बांधलेला आहे.

Rahuri Bus Stand  वरून माझी गाडी आता पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा सिंगल रोड वरून धावू लागते. गावात असताना मुळा नदीच्या पुलावरून प्रवास करत तसेच राहुरी खुर्द ह्या  ठिकाणावरून होत नंतर शिंगवे नाईक इथून पुढे अहमदनगर जवळ सीना नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे Tarakpur Ahmednagar Bus Stand  वर सकाळी 9:00 वाजता फलाट क्रमांक 7 वर पोहोचली.

तारकपूर अहमदनगर बस स्टँडला दोन ठिकाणी फलाट दिलेल्या आहे.ह्या शहरमध्ये दोन ठिकाणी बस स्टँड आहेत पहिला आहे माळीवाडा बस स्टँड जिथून बीड,गेवराई,जामखेड जाण्यासाठी गाड्या सुटतात तसेच दुसरा तारकपूर बस स्टँड जिथून पुणे,कराड जाण्यासाठी गाड्या इथे लागतात.तारकपूर बस स्टँडवर जमिनीवर पेवर ब्लॉक्स बसवले आहेत.तिसरा अहमदनगर शहरात असणारा पुणे बस स्टॅन्ड आहे.

इथून आता माझी बस पुणे स्वारगेट शिरूर मार्गे प्रवास करण्यासाठी परत एकदा सुरू करते. अहमदनगर ते पुणे हा जवळपास 124 किलोमीटरचा अंतर होता. हा अंतर गाठण्य्साठी जवळपास साडेतीन तासांचा कालावधी लागला.

अहमदनगर शहरातून बाहेर पडत Maliwada Ahmednagar Bus Stand  कडून होत तसेच पुढे अहमदनगर येथे पुणे बस स्टॅन्ड ह्या  नावाने असणारा एक असा वेगळाच Bus Stand  इथे माझी बस थोडा काळासाठी थांब घेतल्यानंतर परत एकदा आपल्या प्रवासासाठी निघाली.

वार्डे चौक कडून पुढे हायवेवर धावत असताना सुपा ह्या  ठिकाणावरून पुढे टोल नाका पार करत हायवे लागत असणारा हॉटेल विराट गार्डन ह्या  ठिकाणी जेवणासाठी सकाळी 10:00 वाजता थांबा घेते.हॉटेल विराट गार्डनचा समोर हॉटेल गंगासागर आहे.

इथून पुढे आता माझी गाडी शिरूरच्या दिशेने धावू लागली शिरूर ह्या ठिकाणावरून जवळपास 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे.

हायवेवर धावत असताना घोड नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे Shirur Bus Stand  वर थोडा काळासाठी थांब घेतल्यानंतर पुढचा प्रवास करण्यासाठी परत एकदा माझी एसटी धावली.शिरूर बस स्टँडचा नवीन बांधकाम फार आवडला.खूप मोठा असा बस स्टँड आहे.आतले रस्ते कॉंक्रीटचे आहेत.

गजबजलेल्या शिरूर शहरातून बाहेर पडत शिक्रापूर ह्या  ठिकाणावरून होत तसेच पुढे पाबळ फाटा ह्या  ठिकाणावरून प्रवास करत वेळू नदीच्या पुलावरून होत तसेच कोरेगाव भीमा ह्या  ठिकाणावरून होत.

माझे एसटी कोरेगाव ह्या  ठिकाणी भीमा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे वाघोली नंतर पुणे जवळ मुळा मुठा नदीच्या पुलावरून होत नंतर वाकडेवाडी तसेच संगम पूल पार करून Pune Swargate Bus Stand  वर दुपारी 1:30 वाजता पोहोचलो.ह्या ठिकाणी गाड्यांची आणि प्रवाशांची नेहमी अफाट गर्दी दिसायला मिळते.

शिर्डी वरून ६ तासांचा प्रवास इथे सर्वात गजबजलेल्या आणि व्यस्त Pune Swargate Bus Stand  वरून बाहेर पडत आता कात्रज ह्या  ठिकाणावरून होत तसेच पुढे मांगडेवाडी येथून होत आणि कात्रज घाट पार करत बराच काळ प्रवास केल्यानंतर पुढे जुना कात्रज बोगदा शिंदेवाडी ह्या इथून होत हायवेवर धावत आता माझी एसटी किकवी इथे पुणे इथून दीड तासांचा प्रवास करत जेवणासाठी हॉटेल सूर्या इथे दुपारी 3:00 वाजता थांबा घेते.

जवळपास 20 मिनिटांचा थांबा घेतल्यानंतर माझी बस आता हायवेवर परत एकदा सातारा कराडच्या दिशेने धावू लागते.

धावत असताना शिंदेवाडी ह्या  ठिकाणी नीरा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे बेंगरूटवाडी येथे खंबटगी घाट पार करत पुढे बराच काळानंतर वेळे ह्या  ठिकाणावरून पुढे माझी एसटी आता सातारा शहरात शिरू लागते.

Satara Bus Stand वर फलाट क्रमांक 11 वर दुपारी 4:30 वाजता माझी एसटी इथून पुढे 132 किलोमीटरच्या अंतरावर असणारा इचलकरंजी च्या दिशेने धावू लागते.ह्या बस स्टँडवर नेहमीच गर्दी दिसते.हा शहर कंदी पेडा साठी प्रसिद्ध आहे.

Satara Bus Stand वरून आता शेंद्रे इथून पुढे अतीत नंतर उंब्रज तसेच तासवडे ह्या  ठिकाणी असणारा छोटासा टोल नाका पार करत नंतर वारुंजी च्या पुढे कराड जवळ असणारा कोयना नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस सातारा जिल्हा अंतर्गत असणारा कराड बस स्टँडवर फलाट क्रमांक 20 इथे संध्याकाळी 5:45 वाजता पोहोचली.

कराड बस स्टँडवर भरपूर गर्दी दिसली कारण ह्या वेळी शाळा आणि कॉलेज सुटतात त्यमुळे मुलामुलींचे गर्दी हसणं साहजिकच आहे.कराड बस स्टँडचा बांधकाम जबरदस्त वाटला.आतले रस्ते कॉंक्रीटचे आहेत.

Shirdi To Ichalkaranji Final Destination

कराड बस स्टॅन्ड वरून इचलकरंजी हा प्रवास शिल्लक राहिला होता. कराड शहरातून बाहेर पडत परत एकदा माझी बस आता हायवेवर धावत कासेगाव नंतर पुढे किनी ह्या  ठिकाणी असणारा टोल नाका पार करत नंतर पुढे वाटर तर्फ वडगाव तसेच पुढे पेठ वडगाव नंतर हातकणंगले Bus Stand वर पोहोचल्यानंतर माझी बस आता इचलकरंजी रात्री 8:00 वाजता पोहोचली.

  • Distance: 435 किलोमीटर
  • Routes: Rahuri, Ahmednagar, Shirur, Pune Shivaji Nagar Wakdewadi, Pune Swargate, Satara, Karad,Hatkanangale,
  • Timings: सकाळी 4:30, 7:00 वाजता
  • Travel Duration: 11 Hours
  • Ticket Price: 650 रुपये

अशाप्रकारे माझा शिर्डी ते इचलकरंजी चा हा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

How Much Is Shirdi To Ichalkaranji Msrtc Bus Ticket Price?

650 रुपये

Which Bus Operator Offers The Cheapest Fare From Shirdi To Ichalkaranji?

msrtc bus

How Long Does It Take To Drive From Shirdi To Ichalkaranji?

11 Hours

What Is Shirdi To Ichalkaranji Distance By Road?

435 किलोमीटर

Leave a Comment