How I Travelled From Barshi To Malwan By MSRTC

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Barshi To Malwan ह्या मार्गावरील केलेला प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.

Barshi To Malwan Distance By MSRTC Bus

Barshi To Malwan Distance

Barshi To Malwan हा जवळपास 450 किलोमीटरचा प्रवास होता.बार्शी बस स्टॅन्ड वरून बरोबर 7:00 वाजता माझी बस आपला पुढचा टप्पा गाठण्य्साठी बार्शी बस स्टँडवरून बाहेर पडली. माझी ही गाडी बार्शी पासून पंढरपूर, मिरज, सांगली, कोल्हापूर, राधानगरी, कणकवली आणि शेवटी मालवण ह्या मार्गावर प्रवास केली.

माझ्या ह्या गाडीचा नंबर MH 14 BT 3059 अशाप्रकारे होता. माझी ही गाडी मालवण आगाराची आणि सिंधुदुर्ग विभागाची होती.

Barshi To Malwan MSRTC Bus Timetable

बार्शी ते मालवण जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात

From ToTimingsRoutes
Barshi Malvan 6:30Kurduwadi, Pandharpur, Sangola, Miraj, Jaysingpur, Hatkanangale, Kolhapur Bus Stand, Rankala, Radhanagari, Phonda, Karul, Kankavali

बार्शी बस स्टँड वरून पुढे आता माझी बस बार्शी कुर्डूवाडी हायवे वर धावत शेंद्रे ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे रिधोरे नंतर चिंचगाव तसेच पुढे कुर्डूवाडी बस स्टैंड वर सकाळी 7:40 वाजता पोहोचली. बार्शी पासून कुर्डूवाडी हा जवळपास 33 किलोमीटरचा अंतर आहे.

कुर्डूवाडी बसून वरून पुढे माझी बस आता पंढरपूरच्या दिशेने धावत चालली. लऊळ गावावरून होत तसेच शेटफळ इथून पुढे आष्टी नंतर रोपळे बुद्रुक नंतर आढीव तसेच चंद्रभागा नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता पंढरपूर बस स्टैंड वर सकाळी 8:50 वाजता फलट क्रमांक 24 वर पोहोचली. कुर्डूवाडी बस स्टँड वरून पंढरपूर हा जवळपास 55 किलोमीटरचा अंतर होता.

पंढरपूर बस स्टँड वरून आता माझी बस सांगोलाच्या दिशेने पंढरपूर कोल्हापूर हायवेवर धावत टाकळी ह्या गावावरून होत तसेच बराच काळ धावल्यानंतर खर्डी ह्या ठिकाणावरून होत नंतर बामणी तसेच पुढे सांगोला बस स्टैंड वर सकाळी 9:30 वाजता माझी बस पोहोचली.

सांगोला बस स्टँड वरून पुढे माझी बस परत एकदा हायवेवर धावत अंकढळ येथे असणारा टोल नाका पार करत येथून पुढे जुनोनी नंतर नागझ फाटा तसेच पुढे शिरढोण नंतर थोड्याच अंतरावर पुढे अल्कुड इथे हॉटेल नक्षत्र इथे जेवणासाठी सकाळी 11:00 वाजता थांबा करते.

अल्कुड ह्या ठिकाणावरून कोल्हापूर हा जवळपास 85 किलोमीटर चा अंतर आहे. ह्या ठिकाणावरून कोल्हापूर जाण्यासाठी जवळपास अडीच तासांचा कालावधी लागला.

इथून पुढे परत एकदा माझी बस हायवेवर धावत मिरज बस स्टैंड वर 11:50 वाजता फलाट क्रमांक 6 वर पोहोचली.

फलट क्रमांक 6 वरून पणजी, गारगोटी, देवरुख, रत्नागिरी, ज्योतिबा, विशालगड, देवगड, वेंगुर्ले, कोल्हापूर, राजापूर, संगमेश्वर आणि गगनबावडा ह्या सगळ्या मार्गावर जाणारे जे बसेस होते ते फलट क्रमांक सहा वरून सुटतात. मिरज बस स्टैंड वर गाडीचे चालक आणि वाहक यांची बदली झाली.

मिरज बस स्टॅन्ड हा मिरज तालुका तसेच सांगली जिल्हा अंतर्गत मोडतो. मिरज बस स्टँडवरून पुढे आता माझी गाडी सांगली बस स्टैंड वर दुपारी 12:15 वाजता थांबा घेत पुढे अंकली ह्या ठिकाणी कृष्णा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे जयसिंगपूर बस स्टैंड वर दुपारी 12:30 वाजता माझी बस धावत दुपारी 1:00 वाजता हातकणंगले बस स्टैंड वर पोहोचत तसेच पुढे कोल्हापूर येथे पंचगंगा नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता कोल्हापूर बस स्टैंड वर 2:00 वाजता फलाट क्रमांक 14 वर पोहोचली.

बार्शी पासून कोल्हापूर बस स्टॅन्ड पर्यंत 265 किलोमीटरचा अंतर पार झाला होता. तर मित्रांनो कोल्हापूर बस स्टँड वरून आता मालवण फोंडाघाट मार्गे हा जवळपास 150 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

Barshi To Malwan Ticket Price

Barshi To Malwan हा जवळपास 735 रुपये असं तिकीट दर आहे जे कालांतराने तिकीट भाडं बदलू शकतो.आतापर्यंत सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा तसेच कोल्हापूर जिल्हा अशा ह्या तीन जिल्हा मधून माझी बस प्रवास केली होती.

कोल्हापूर बस स्टँड वरून पुढे आता माझी बस रंकाळा तलाव कडून होत तसेच पुढे कोल्हापूर राधानगरी हायवेवर धावत माझी बस वाशी ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे हळदी ह्या ठिकाणावरून पुढे बराच काळ हायवेवर धावत कोथळी नंतर भोगावती तसेच शिरसे हा ठिकाण करत माझी बस आता राधानगरी बस स्टैंड वर फलट क्रमांक 1 वर दुपारी 4:00 वाजता जेवणासाठी थांबा घेते.

जवळपास वीस मिनिटं जेवणासाठी थांबल्यानंतर माझी बस आता पुढचा टप्पा गाठण्यासाठी मालवणच्या दिशेने धावू लागली. मालवण हा राधानगरी बस स्टँड वरून जवळपास 100 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे.

इथून पुढे फोंडा घाट मार्गे माझी बस आता फोंडाघाट बस स्टैंड वर संध्याकाळी 5:45 वाजता पोहोचली. इथून पुढे मालवण हा जवळपास 65 किलोमीटरचा अंतरावर आहे.

फोंडाघाट बस स्टँड पासून पुढे आता माझी बस मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेवर धावत कणकवली बस स्टँडवर संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचत पुढचा टप्पा गाठण्यासाठी कणकवली येथे गड नदीच्या पुलावरून प्रवास करत तसेच पुढे कसाल बस स्टैंड वर संध्याकाळी 7:00 वाजता पोहोचत पुढचा टप्पा पार करण्यासाठी कसाल मालवण हायवेवर धावत पुढे सुकाळवाडी ह्या ठिकाणावरून होत तसेच बाजारपेठ कट्टा इथून पुढे चौके ह्या ठिकाणावरून होत शेवटी मालवण बस स्टैंड वर रात्री 8:00 वाजता पोहोचली.

अशाप्रकारे माझा हा Barshi To Malwan चा 13 तासांचा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

How Long Does It Take To Drive From Barshi To Malwan?

Around 10.30 Hours

What Are The Boarding Points From Barshi To Malwan?

बार्शी पासून पंढरपूर, मिरज, सांगली, कोल्हापूर, राधानगरी, कणकवली आणि शेवटी मालवण

What Is The Minimum Bus Ticket Fare From Barshi To Malwan?

735 रुपये

Leave a Comment