How I Travelled From Nashik To Ichalkaranji By Bus

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे माझा Nashik To Ichalkaranji  ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.

तर मित्रांनो मी आता अर्धा तास अगोदरच नाशिक महामार्ग बस स्टैंड वर येऊन माझ्या बसची वाट पाहत थांबलो होतो.नाशिक नवीन बस स्टैंड ते नाशिक महामार्ग बस स्टैंड वर येण्यासाठीच 30 रुपये रिक्षा करून येऊ शकता.इचलकरंजी तसेच गारगोटी च्या दिशेने जाणाऱ्या गाड्या नाशिक महामार्ग बस स्टैंड वरून सुटतात.

तर बरोबर 7:00 वाजता माझी गाडी आता नाशिक महामार्ग बस स्टँडवरून नाशिक नवीन बस स्टँड च्या दिशेने प्रवास करत आणि इथे 7:30 वाजता फलट क्रमांक पाचवर पोहोचत इथे थोड्या वेळासाठी प्रवासांना घेत आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा धावली.नाशिक नवीन बस स्टैंड वर गडांच्या आणि लोकांची रहदारी दिसून येईल.

ह्या गाडीचा मार्ग नाशिक पासून संगमनेर, पुणे स्वारगेट, सातारा, कराड, वडगाव, हातकणंगले आणि शेवटी इचलकरंजी अशा प्रकारे होता.

Nashik To IchalkaranjiMSRTC Bus Timetable

नाशिक ते इचलकरंजी जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात

From ToTimingsRoutes
Nashik New CBS Ichalkaranji  08:00Sinnar, Sangamner, Alephata, Narayangaon, Manchar, Rajgurunagar, Chakan, Pune Shivaji Nagar Wakdewadi, Pune Swargate, Katraj, Satara, Umbraj, Karad, Hatkanangale

Nashik To Ichalkaranji Distance By Road

Nashik To Ichalkaranji Distance

Nashik To Ichalkaranji  हा जवळपास 468 किलोमीटरचा अंतर आहे. अर्धा तास नाशिक मध्यवर्ती नवीन बस स्टैंड वर थांबल्यानंतर सकाळी 8:00 वाजता ही गाडी इथून पुढे आपला टप्पा पार करण्यास सुरुवात करते.

सरदार विंचुरकर चौक कडून होत तसेच पुढे द्वारका चौक इथून तसेच बिटको चौक कडून आता माझी बस नाशिक रोड बस स्टैंड वर थोड्यावेळासाठी थांबा घेत पुढे धावत जाते..

घेहदी ह्या ठिकाणावरून होत तसेच पळसे ह्या ठिकाणी धारणा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे शिंदे टोलनाका पार करत पुढे सिन्नर बस स्टैंड वर सकाळी 9:00 वाजता फलाट क्रमांक पाचवर पोहोचली.सिन्नर बस स्टॅन्ड वरून गाडी फुल झाली.हा सिन्नर बस स्टॅन्ड फार सुंदर स्वच्छ आणि नवीन बांधलेला आहे.

सिन्नर बस स्टॅन्ड वरून पुढे माझी बस पुढे गुरेवाडी ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे धोंडी बुद्रुक नंतर संगमनेर जवळ घुलेवाडी ह्या ठिकाणावरून होत पार करत संगमनेर बस स्टैंड वर 9:45 वाजता प्लॉट क्रमांक 14 वर पोहोचली. सिन्नर बस स्टॅन्ड सारखाच हा बस स्टॅन्ड फार सुंदर, स्वच्छ,नवीन बांधकाम असलेला आहे.

इथून पुढे माझी बस आता संगमनेर खुर्द ह्या ठिकाणी प्रवरा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे विवरगाव पावसा टोल नाका पार करत तसेच चंदनपुरी घाट पार करत नंतर घारगाव ह्या सगळ्या मार्गावरून होत आळेफाटा बस स्टँड वर 11:15 वाजता पोहोचली.

इथून पुढे आळेफाटा च्या पुढे साखरेवाडी टोलनाका पार करत भोरवाडी नंतर नारायणगाव बस स्टैंड वर सकाळी 11:40 वाजता पोहोचली.

नारायणगाव बस स्टॅन्ड वरून पुणे जवळपास 80 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. हा रस्ता गाठण्य्साठी जवळपास तीन तासांचा कालावधी लागला.नारायणगाव बस स्टॅन्डचा बांधकाम सुरु होता.नाशिक ते नारायणगाव बस स्टॅन्ड पर्यंतचा रस्ता मस्त वाटला.

माझी बस आता नारायणगाव ठिकाणी मीना नदीच्या पुलावरून प्रवास करत तसेच पुढे कळंब येथे घोड नदीच्या पुलावरून होत नंतर मंचर बस स्टैंड वर दुपारी 12:00 वाजता पाहोचली.मंचर बस स्टैंड वर भरपूर गर्दी पाहायला मिळाली.

ह्या ठिकाणावरून स्वारगेट जवळपास 66 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.जवळपास अर्धा तासांचा प्रवास करत माझी बस आता राजगुरुनगर बस स्टैंड वर दुपारी 12:30 वाजता पोहोचली .ह्या ठिकाणावरून पुणे 45 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.

भीमा नदीच्या पुलावरून प्रवास करत बराच काळ हायवेवर धावल्यानंतर मी आता चाकण ह्या ठिकाणी नंतर पिंपरी चिंचवड तसेच पुढे भोसरी अशाच प्रकारे शिवाजीनगर बस स्टँड वरून पुढे पुणे स्वारगेट वर दुपारी 2:22 वाजता पोहोचलो.पुणे स्वारगेट हा खूप गर्दी असणारा तसेच महाराष्टतील सर्वात गजबजलेल्या बस स्टॅन्ड मधला एक आहे.इथे वेगळे वेगळ्या ठिकाणी जाणारे आणि येणारे गाड्या दिसतील.

आतापर्यंत नाशिक पासून 215 किलोमीटरचा पल्ला पार केला होता. येथून पुढे 268 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता.हा टप्पा गाठण्य्साठी जवळपास साडेपाच तासांचा कालावधी लागला.

पुणे स्वारगेट वरून आता माझी बस पुणे शहरातून बाहेर पडत कात्रज ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे कात्रज घाट पार करत अशाच प्रकारे पुढे खेड शिवापूर येथे टोल नाका पार करून कामथडी ह्या ठिकाणावरून होत तसेच कापूरहोळ नंतर सारोळा येथे नीरा नदीच्या पुलावरून होत तसेच पारगाव खंडाळा ह्या ठिकाणावरून होत पुढे बेंगरूटवाडी नंतर खंबाटकी घाट पार करत पुढे दौलत प्युअर व्हेज ह्या हॉटेलवर दुपारी 4:15 वाजता जेवणासाठी थांबा घेते.

इथून सातारा 40 किलोमीटरचा अंतरावर स्थित आहे. चाळीस किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी जवळपास दीड ते दोन तासांचा कालावधी लागला. तसेच इचलकरंजी बस स्टँड हा 168 किलोमीटरच्या अंतरावर होता.

येथून पुढे माझी बस परत एकदा हायवेवर धावत पुढे आणेवाडी टोलनाका पार करत नंतर म्हसवे ह्या ठिकाणावरून पुढे वाळेफाटा नंतर अशाच प्रकारे सातारा बस स्टैंड वर माझी बस संध्याकाळी 5:20 वाजता पोहोचली.

इथून इचलकरंजी 132 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे.हा 132 किलोमीटर गाठण्यासाठी जवळपास साडेतीन तासांचा कालावधी लागला.सातारा बस स्टैंड वर सुद्धा तसीच गर्दी पाहायला मिळाली.कंदी पेड्यांचा शहर असा सातारा जिल्हाला ओळखला जातं.सातारा बस स्टैंड वर शाळा आणि कॉलेज सुटल्यामुळे विद्यार्थी ह्यांची गर्दी दिसली.

पुढचा टप्पा कराड बस स्टॅन्ड गाठण्यासाठी माझे बस परत एकदा धावू लागली. सातारा वरून कराड हा जवळपास 54 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. तसेच सातारा वरून कराड हा दीड तासांचा अंतरावर स्थित आहे.

सातारा बस स्टँड वरून पुढे माझे बस आता हायवेवर धावत अतीत ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे काशीळ नंतर उंब्रज अशाच प्रकारे पुढे तासवडे टोल नाका पार करत नंतर कोयना नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस कराड जवळ कोल्हापूर नाका इकडून होत पुढे कराड बस स्टैंड वर फ्लॅट क्रमांक वीस वर संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचली.हळूहळू अंधार पसरत चालला होता आणि संध्याकाळ होत होती.कराड बस स्टैंड सातारा जिल्हा अंतर्गत मोडतो.

Nashik To Ichalkaranji Final Destination

कराड बस स्टँडवरून इचलकरंजी दोन तासाचा प्रवास शिल्लक राहिला होता. कराड बस स्टँडवरून आता माझी बस हायवेवर धावत मलकापूर ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे कासेगाव नंतर कामेरी अशाच प्रकारे किनी टोल नाका पार करत वाठार वडगाव ह्या बस स्टैंड वर बाजारपेठ मधून वाट काढत संध्याकाळी 7:30 वाजता पोहोचत नंतर पेठ वडगाव कडून पुढे हातकणंगले बस स्टैंड वर थोडा काळासाठी थांबा घेत परत एकदा धावत माझी बस आता इचलकरंजी बस स्टैंड वर रात्री 8:30 वाजता पोहोचली.

  • Distance: 468 किलोमीटर
  • Routes: नाशिक पासून संगमनेर, पुणे स्वारगेट, सातारा, कराड, वडगाव, हातकणंगले आणि शेवटी इचलकरंजी
  • Timings: 08:00 a.m
  • Travel Duration: 12 Hrs
  • Ticket Price: 550 Rupees

अशाप्रकारे माझा Nashik To Ichalkaranji  चा लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

How Much Is Nashik To Ichalkaranji Msrtc Bus Ticket Price?

550 Rupees

What Are The Boarding Points From Nashik To Ichalkaranji?

नाशिक पासून संगमनेर, पुणे स्वारगेट, सातारा, कराड, वडगाव, हातकणंगले आणि शेवटी इचलकरंजी

Which Bus Operator Offers The Cheapest Fare From Nashik To Ichalkaranji?

msrtc bus

Leave a Comment