How I Travelled From Kalyan To Bhimashankar By MSRTC

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगद्वारे मी केलेला Kalyan To Bhimashankar माळशेज घाट मार्गे ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.

तर मित्रांनो मी आता ठाणे जिल्ह्यातला कल्याण बस स्टैंड वर दुपारी 12:30 वाजता येऊन माझी बसची वाट पाहत होतो.

What Is Kalyan To Bhimashankar Distance By Road?

Kalyan To Bhimashankar Distance

माझा हा प्रवास कल्याण ते भीमाशंकर जवळपास 180 किलोमीटरचा प्रवास ठरला.माझी ही गाडी ठाणे विभागाची आणि कल्याण आगारातली होती. ह्या गाडीचा मार्ग कल्याण बस स्टँडवरून जुन्नर, घोडेगाव, डिंबा, तळेघर आणि शेवटी भीमाशंकर अशा प्रकारे होता. माझ्या ह्या गाडीचा नंबर MH 20 BL 3049 होता.

Kalyan To Bhimashankar MSRTC Bus Timetable

कल्याण ते भीमाशंकर जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात

From ToTimingsRoutes
KalyanBhimashankar 1:10Junnar, Ghodegaon, Dimba, Talegar

Kalyan To Bhimashankar Ticket Price

कल्याण बस स्टँड वरून भीमाशंकर चा टिकीट दर 285 रुपये अशाप्रकारे होता जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे ह्याची नोंद घ्यावी.तर मित्रांनो बरोबर दुपारी 1:10 वाजता माझी बस आता आपला पुढचा टप्पा पार करण्यास कल्याण बस स्टँडवरून बाहेर पडली.

कल्याण शहरातून बाहेर पडत असताना रायते ह्या ठिकाणी उल्हास नदीच्या पुलावरून प्रवास करत अहमदनगर कल्याण हायवेवर धावत माझी बस आता मुरबाड बस स्टैंड वर दुपारी 2:30 वाजता पोहोचली.

इथून पुढे परत एकदा माझी बस बराच काळ धावल्यानंतर सरळगाव ह्या ठिकाणावरून होत पुढे टोकावडे इथून पुढे बराच काळ धावत मोरोशी ह्या ठिकाणी 3:20 वाजता हॉटेल मोरया ह्या ठिकाणी जेवण्यासाठी थांबा घेते.

इथून पुढे माळशेज घाट मार्गे माझी बस आता पुढचा प्रवास गाठण्यासाठी परत एकदा धावू लागली. माळशेज घाट पार केल्यानंतर आता माझी बस बंदकर फाटा ह्या ठिकाणावरून पुढे ओतूर जुन्नर हवेवर धावत पांगरीमाथा नंतर पिंपळगाव सिद्धनाथ तसेच पुढे जुन्नर बस स्टैंड वर संध्याकाळी 5:00 वाजता पोहोचली होती.

जुन्नर बस स्टँडवरून भीमाशंकर हा जवळपास 75 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. जुन्नर बस स्टँड वरून पुढे माझी बस आता जुन्नर घोडेगाव हायवेवर धावत सावरगाव ह्या ठिकाणावरून होत पुढे चिंचोली नंतर घोडेगाव बस स्टैंड वर संध्याकाळी 6:00 वाजता पोहोचली.

जुन्नर बस स्टँडवरून घोडेगाव बस स्टँड हा जवळपास एक तासांचा कालावधी लागला. परत एकदा हायवेवर धावत माझी बास आता डिंबे ह्या ठिकाणावरून बराच काळ प्रवास करत माझी बस आता तळेघर इथून पुढे भीमाशंकर बस स्टँडवर रात्री 7:45 वाजता पोहोचली.

अशाप्रकारे माझा कल्याण बस स्टँडवरून भीमाशंकर चा हा प्रवास पूर्ण झाला. ह्या मार्गावर दोन जिल्हे पाहण्याचा पाण्याचा मला योग्य मिळाला पहिला जिल्हा ते ठाणे जिल्हा आणि नंतर पुणे जिल्हा.

FAQs

How Much Is Kalyan To Bhimashankar Msrtc Bus Ticket Price?

285 रुपये

How Long Does It Take To Drive From Kalyan To Bhimashankar?

7 Hours

What Is the distance from Kalyan By Road?

180 किलोमीटर

Leave a Comment