How I Travelled From Dharmabad To Shegaon By MSRTC

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे माझा Dharmabad To Shegaon ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे. शेगाव हा बुलढाणा जिल्हा अंतर्गत मोडतो.

Dharmabad To Shegaon Distance By MSRTC Bus

Dharmabad To Shegaon Distance

मी ज्या गाडीने प्रवास केला ते गाडी बिलोली आगारातली होती. Dharmabad To Shegaon हा जवळपास 400 किलोमीटरचा प्रवास होता.

माझी ही गाडी सकाळी 9:00 वाजता आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी धर्माबाद बस स्टँडवरून निघाली.

Dharmabad To Shegaon MSRTC Bus Timetable

धर्माबाद ते शेगाव जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात

From ToTimingsRoutes
DharmabadShegaon9:00Biloli, Nanded, Aundha, Hingoli, Risod

माझा ह्या गाडीचा मार्ग धर्माबाद पासून बिलोली, नांदेड, औंढा, हिंगोली, रिसोड आणि शेवटी शेगाव अशाप्रकारे होता.ह्या गाडीचा नंबर MH 14 MH 1101 होता.

आता माझी गाडी धर्माबाद बस स्टँडवरून पुढे धर्माबाद बिलोली हायवेवर धावत बाभळी ह्या ठिकाणी गोदावरी नदीच्या पुलाच्या वरून प्रवास करत पुढे बिलोली बस स्टँडवर सकाळी 9:50 वाजता फलट क्रमांक एक वर पोहोचली.

ह्या फ्लॅट क्रमांक एक वर नांदेड, अक्कलकोट, छत्रपती संभाजी नगर आणि शेगाव ह्या मार्गावर जाणारे बसेस सूटतात. बिलोली बस स्टैंड वर एकूण दहा फलाट दिलेले आहेत. बिलोली बस स्टॅन्ड ला दोन बाजू बस स्टँड दिलेले आहेत पहिली बाजू एक ते पाच फलट आणि दुसरी बाजू सहा ते दहा अशाप्रकारे आहे.

तर बिलोली बस स्टँड वरून पुढे आता माझी बस नरसी बस स्टँडवर सकाळी 10:20 वाजता पोहोचली.

इथून पुढे माझी बस नरसी नांदेड ह्या हायवेवर धावत पुढे नांदेड जवळ गोदावरी नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता नांदेड बस स्टैंड वर सकाळी 11:45 वाजता फ्लॅट क्रमांक दहावर पोहोचली.

ह्या फ्लॅट वरून शेगाव, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, कळमनुरी, बाळापुर, रिसोड, मलकापूर, वारंगा, सादरगाव, वैजापूर, पार्डी ह्या मार्गावर जाणारे बसेस सुटतात.

धर्माबाद पासून नांदेड बस स्टॅन्ड हा जवळपास 95 किलोमीटरचा प्रवास माझा आतापर्यंत पूर्ण झाला होता. हा अंतर गाठण्यासाठी मला जवळपास साडेतीन तासांचा कालावधी लागला.

नांदेड बस स्टँड वर माझी गाडी जवळपास 20 मिनिटं नाश्त्यासाठी थांबली होती.

पुढे नांदेड माळेगाव ह्या हायवेवर धावत माझी बस आता मालेगाव ह्या ठिकाणावरून पुढे जिंतूर नांदेड हायवेवर धावत वसमत बस स्टैंड वर दुपारी 1:30 वाजता पोहोचली.

इथून पुढे माझी बस परत एकदा हायवेवर धावत शिरड शहापूर ह्या ठिकाणावरून होत औंढा नागनाथ इथे दुपारी 2:10 वाजता पोहोचली. धर्माबाद पासून जवळपास 150 किलोमीटरचा अंतर गाठत मी ह्या ठिकाणी औंढा नागनाथ येथे पोहोचलो होतो.

औंढा नागनाथ ते हिंगोली जवळपास 25 किलोमीटरचा अंतर आहे.

बराच काळ धावल्यानंतर माझी गाडी आता हिंगोली इथे दुपारी 2:45  वाजता फलट क्रमांक तेरावर पोहोचली. ह्या फ्लॅटवरून सेनगाव, पुसेगाव, रिसोड, चिखली, नरसी नामदेव, जांभरुण, धानोरा, येलदरी, जामदह्या, जयपुर भुशी, खिल्लार ह्या मार्गावर जाणारे गाड्या सुटतात.

आता माझी बस हिंगोली सेनगाव मार्गावर धावत नरसी नामदेव ह्या ठिकाणावरून होत बराच काळ धावल्यानंतर पुढे सेनगाव बस स्टैंड वर दुपारी 3:30 वाजता पोहोचली.

पुढे माझी बस जेवणासाठी 3:45 वाजता थांबा घेते इथून पुढे सेनगाव रिसोड हायवेवर धावत रिसोड बस स्टैंड वर दुपारी 4:15 वाजता पोहोचली.

आतापर्यंत माझी एसटी नांदेड जिल्हा परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्हा आणि वाशिम जिल्हा ह्या सगळ्या जिल्ह्यामधून प्रवास पूर्ण केली होती.

इथून पुढे मालेगाव परतुर शेगाव मार्गे गाठण्यासाठी बरोबर 5:00 वाजता रिसोड बस स्टँडवरून निघाली.

तर मित्रांनो माझी गाडी आता रिसोड अकोला हायवेवर धावत पुढे पातुर घाट पार करत आता माझी एसटी पातुर बस स्टैंड वर बरोबर 6:00 वाजता पोहोचली होती.

Dharmabad To Shegaon Final Destination

इथून पुढे माझी गाडी तिचा पुढचा प्रवास गाठण्यासाठी धावत बाळापुर ह्या ठिकाणी मन नदीच्या पुलावरून प्रवास करत बाळापुर  इथे संध्याकाळी 7:00 वाजता पोहोचत पुढे बाळापुर शेगाव हायवेवर धावत माझी बस आता शेगाव बस स्टैंड वर रात्री 8:00 वाजता पोहोचली.

अशाप्रकारे माझा Dharmabad To Shegaon चा हा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

What Are The Boarding Points From Dharmabad To Shegaon?

धर्माबाद पासून बिलोली, नांदेड, औंढा, हिंगोली, रिसोड आणि शेवटी शेगाव

How Much Is Dharmabad To Shegaon Msrtc Bus Ticket Price?

550 Rupees Approximately

How Long Does It Take To Drive From Dharmabad To Shegaon?

6 hours

Leave a Comment