How I Travelled From Nashik To Chikhali By Bus

नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे माझा Nashik to Chikhali ह्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.

मी आता नाशिक मध्यवर्ती बस स्टैंड म्हणजे Nashik Central Bus Stand वर येऊन आपल्या बसची वाट पाहत हजर झालो होतो.बस निघायला अजून वेळ होता म्हणून विचार केला चला काही तरी नाश्ता करून घेयू .

तर मी बस स्टैंडच्या बाहेर एका हॉटेल मध्ये शिरलो आणि उपीट आणि चहा मागवली.ह्याचा खर्च जवळपास 40 रुपये झाला.नाशिक मध्यवर्ती बस स्टैंड हा फार गजबजलेला असा बस स्तनाक आहे.इथून भरपूर लांब पल्यांचे गाड्या सुटतात.

तर मित्रांनो बरोबर 6:30 वाजता माझे ही गाडी आपल्या पुढचा टप्पा गाठण्यासाठी फलट क्रमांक तीन वरून प्रवास करायला सुरू करते.फलट क्रमांक तीनवर जाणाऱ्या जे बसेस आहेत ते अमरावती अकोला नागपूर बुलढाणा खामगाव चिखली, मलकापूर गाव भुसावळ जळगाव ब्रह्मणपुर आणि शेवटी इंदोर ह्या मार्गावर जाणारे बसेस फलट क्रमांक तीन वरून सुटतात.सकाळची वेळ होती म्हणून रस्त्यावर जास्त ट्राफिक नाही मिळाली.

Nashik To Chikhali Distance By Bus

Nashik To Chikhali Distance

Nashik to Chikhali हा 450 किलोमीटरचा अंतर आहे. ह्या गाडीचा मार्ग नाशिक बस स्टँड वरून धुळे नंतर जळगाव नंतर मलकापूर नंतर बुलढाणा आणि शेवटी चिखली अशाप्रकारे होता. ह्या गाडीचा नंबर MH 20 GC 2904 होता.

Nashik to Chikhali Ticket Price By Bus

Nashik to Chikhali पर्यंतचा जो महाराष्ट्र एसटीद्वारे तिकीट दर जवळपास 610 रुपये होता जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.

Nashik To Chikhali MSRTC Bus Timetable

नाशिक ते चिखली जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात

From ToTimingsRoutes
Nashik New CBS Chikhali 6:30, 8:15, 20:00 via Chalisgaon 20:45 Via Aurangabad, Yeola, Vaijapur, Chatrapati Sambhaji Nagar (Aurangabad), Jalna,Dhule, Jalgaon, Malkapur, Buldhana
Nashik Highway  Stand Chikhali 20:30 Malegaon, Muktainagar, Buldhana

तर मित्रांनो नाशिक बस स्टँडवरून बाहेर पडत सरदार सर्कल कडून होत माझी बस आता तिचा पुढचा प्रवास करण्यासाठी धावू लागली.

मुंबई आग्रा हायवेवर धावत असताना ओझर ह्या ठिकाणावरून होत तसेच पुढे कोकणगाव नंतर कादवा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे मुंबई आग्रा हायवे सोडून खाली सिंगल रस्त्यावर प्रवास करत पिंपळगाव बसवंत इथून परत एकदा मुंबई आग्रा हायवे वर धावत पुढे टोलनाका पार करत नंतर पुढे पिंपळगाव बसवंत ह्या गावावरून होत पुढे चांदवड ह्या ठिकाणी टोल नाका पार करत तसेच वाटेत लागणारा राहूड तलाव कडून होत पुढे राहूड ह्या गावावरून प्रवास करत.

तसेच मालेगाव येथे एकलव्य पुलावरून प्रवास करत थोडा अंतरावर मालेगाव ह्या ठिकाणी महात्मा फुले स्मारक कडून होत माझी एसटी आता मालेगाव बस स्टैंड वर सकाळी 8:30 वाजता फलट क्रमांक आठवर पोहोचली.मालेगाव बस स्टैंड फार मोटा आहे.अजून तर मातीचं रस्ते आहे.

फलट क्रमांक आठ वरून जाणाऱ्या गाड्या शहादा, चोपडा, अमळनेर आणि अक्कलकुवा ह्या मार्गावर जाणारे बसेस सुटतात. आतापर्यंत नाशिक बस स्टॅन्ड वरून 107 किलोमीटरचा अंतर पार झाला होता.

इथून पुढे माझी बस धुळे च्या दिशेने धावणार होती तर मालेगाव पासून धुळे हा जवळपास 50 किलोमीटरचा अंतर होता.

मालेगाव बस स्टँडवरून पुढे माझी बस हायवेवर धावत असताना झोडगे ह्या ठिकाणावरून होत पुढे धुळे जवळ असणारा टोल नाका पार करत माझी बस धुळे बस स्टैंड वर सकाळी 9:45 वाजता पोहोचली.

आतापर्यंत नाशिकपासून 157 किलोमीटरचा प्रवास करत मी आता धुळे बस स्टँडवर पोहोचलो होतो.धुळे बस स्टँडवर गर्दी पाहायला मिळाली.ह्या ठिकाणी बस पूर्णपणे भरली.

पंधरा मिनिटं धुळे बस स्टैंड वर थांबा घेतल्यानंतर माझी बस पुढचा प्रवास करण्यासाठी परत एकदा बस स्टँडच्या बाहेर पडत आपला प्रवास सुरू करण्यास तैयार झाली.

फागणे ह्या ठिकाणावरून होत तसेच मुकटी इथून पुढे विचखेडे ह्या ठिकाणी बोरी नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे पारोळा बस स्टैंड वर 11:15 वाजता पोहोचली.पारोळा बस स्टॅन्ड हा पारोळा तालुका तसेच जळगाव जिल्हा अंतर्गत मोडतो .

इथून पुढे माझी बस हायवे वर धावत एरंडोल बस स्टैंड वर सकाळी 11:30 वाजता पोहोचली.एरंडोल बस स्टॅन्डचा आतला परिसर मातीचं आहे आणि बांधकाम जुनाच आहे.

एरंडोल बस स्टॅन्ड वरून जळगाव हा 34 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता .

पाळधी ह्या ठिकाणावरून होत पुढे बंभोरी गावाच्या जवळ गिरणा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे जळगाव जवळ आकाशवाणी चौक कडून होत माझी बस आता जळगाव बस स्टैंड वर दुपारी 12:30 वाजता पोहोचली.

आतापर्यंत नाशिक बस स्टँडवरून जळगाव हा 250 किलोमीटरचा टप्पा पार झाला होता.जळगाव बस स्टैंड वर भन्नाट गर्दी दिसली.ह्याच ठिकाणी चिखली ते नाशिक बस रिटर्न बस बघायला मिळाली.

जळगाव वरून आता माझी बस पुढचा टप्पा पार करण्यासाठी परत एकदा हायवेवर धावत नशिराबाद ह्या ठिकाणावरून होत पुढे टोल नाका पार करत भुसावळ ह्या ठिकाणी नहाटा चौक कडून होत भुसावळ बस स्टैंड वर दुपारी 1:15 वाजता पाहोचली.

भुसावळ बस स्टँड ला चिटकूनच भुसावळ रेल्वे स्टेशन सुद्धा आहे.भुसावळ बस स्टँडचा आतला परिसर मध्ये तुम्हाला माती आणि दगड दिसतील.

इथून पुढे माझी बस 60 किलोमीटरचा अंतरावर असणारा मुक्ताईनगरच्या दिशेने धावू लागली. तर मित्रांनो निंभोरे बुद्रुक ह्या ठिकाणावरून होत तसेच वरणगाव नंतर मुक्ताईनगर बस स्टैंड वर दुपारी 2:00 वाजता पोहोचल्यानंतर पुढचा टप्पा गाठण्य्साठी परत एकदा हायवेवर धावत दसरखेड ह्या ठिकाणी टोल नाका पार करत तसेच पुढे धरणगाव नंतर मलकापूर बस स्टैंड वर 2:45 वाजता पोहोचली.मलकापूर बस स्टँडवर खूप गर्दी बघायला मिळाली.

मलकापूर बस स्टँडवरून चिखली आता जवळपास दोन तासांचा प्रवास शिल्लक राहिला होता. मलकापूर बस स्टँड पासून चिखली आता 70 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे.

मलकापूर बस स्टँड वरून पुढे सिंगल रस्त्यावरून प्रवास करत दाताळा ह्या ठिकाणावरून होत तसेच मातोळा बस स्टँडवर थोडा काळासाठी थांबा घेत पुढचा टप्पा गाठण्य्साठी परत एकदा वाघजळ ह्या ठिकाणावरून होत राजुर घाट पार करत बुलढाणा बस स्टैंड दहावा टप्प्या वर दुपारी 4:00 वाजता पोहोचली.बुलढाणा शहर सैलानी बाबा यात्रा साठी फार प्रसिद्ध आहे.ह्या ठिकाणी जितके उतरले तितकेच चढले.

बुलढाणा बस स्टँड वरून चिखली हा 25 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. आतापर्यंत नाशिक बस स्टँड वरून बुलढाणा बस स्टँड पर्यंत ३७० किलोमीटरचा टप्पा पार झाला होता.

  • Distance: 450 किलोमीटर
  • Routes: नाशिक बस स्टँड वरून धुळे नंतर जळगाव नंतर मलकापूर नंतर बुलढाणा आणि शेवटी चिखली
  • Timings: 6:30, 8:15, 20:00
  • Travel Duration: 11 Hours
  • Ticket Price: 610 रुपये

Nashik To Chikhali Final Destination

सिंगल रस्त्यावरून प्रवास करत हातनी  ह्या ठिकाणावरून पुढे चिखली बस स्टैंड वर माझी बस संध्याकाळी 5:00 वाजता पोहोचली.अशाप्रकारे माझा नाशिक मध्यवर्ती बस स्टँड पासून चिखली पर्यंत हा प्रवास पूर्ण झाला.

FAQs

Which Bus Operator Offers The Cheapest Fare From Nashik To Chikhali?

msrtc bus

How Much Is Nashik To Chikhali Msrtc Bus Ticket Price?

610 रुपये

What Are The Boarding Points From Nashik To Chikhali?

नाशिक बस स्टँड वरून धुळे नंतर जळगाव नंतर मलकापूर नंतर बुलढाणा आणि शेवटी चिखली

What Is Nashik To Chikhali Distance By Road?

450 किलोमीटर

Leave a Comment