नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगद्वारे Nagpur To Indore ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
Table of Contents
Nagpur To Indore Distance

हा प्रवास विदर्भातून झाला तसेच हा माझा प्रवास आंतरराज्य प्रवास ठरला. Nagpur To Indore हा जवळपास 550 किलोमीटरचा आहे.
तर मित्रांनो नागपूर गणेश पेठ बस स्टैंड वर दोन ठिकाणी फलाट दिलेले आहेत. ह्या गाडीचा वेळ सकाळी 5:15 वाजता नागपूर गणेश पेठ बस स्टँड मधून निघते.
Nagpur To Indore MSRTC Bus Timetable
Nagpur Bus Stand वरून Indore जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.
| From | To | Timings | Routes |
| Nagpur | Indore | 05:15 | Karanja, Amravati, Paratwada, Harisal,Dharni,Shirpur, Burhanpur, Khandwa, Sanavad, |
ह्या गाडीचा मार्ग नागपूर पासून अमरावती, परतवाडा, हरीसाल, धरणी, बऱ्हाणपूर आणि शेवटी इंदोर अशाप्रकारे आहे.ह्या गाडीचा नंबर MH 40 AQ 6420 होता.
Nagpur To Indore Ticket Price
Nagpur To Indore तिकीट भाडा जवळपास 850 रुपये होता जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
तर मित्रांनो नागपूर शहरातून बाहेर पडत माझी एसटी आता मुंबई नागपूर एक्सप्रेस हायवे वरून प्रवास करत कोंढाळी बस स्टैंड वर सकाळी 6:15 वाजता पोहोचली.
इथून पुढे हायवेवर प्रवास करत कारंजा घाडगे ह्या ठिकाणी सकाळी 6:45 वाजता पोहोचत पुढे परत एकदा माझी बस हायवेवरून प्रवास करण्यासाठी धावू लागली.
धावत असताना तळेगाव बस स्टैंड वर सकाळी 7:15 वाजता पोहोचत पुढे परत एकदा वर्धा नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता अमरावती बस स्टँड मध्ये सकाळी 8:10 वाजता दाखल झाली.
नागपूर पासून अमरावती 150 किलोमीटरचा अंतर पार करत मी पोहोचलो होतो अमरावती बस स्टैंड वर. येथून पुढे 50 किलोमीटर अंतरावर असणारा परतवाडा च्या दिशेने माझी बस आता धावू लागली.
अमरावती शहरामध्ये तीन ठिकाणी बस स्टॅन्ड दिलेल्या आहेत बडनेरा, राजापेठ आणि अमरावती मध्यवर्ती बस स्टॅन्ड.
परत एकदा परतवाडा अमरावती हायवे वरून प्रवास करत वलगाव ह्या ठिकाणावरून होत आसेगाव पूर्णा नंतर माझी बस आता परतवाडा बस स्टँड वर सकाळी 9:30 वाजता पोहोचली.
परतवाडा ह्या ठिकाणी माझी बसची डिझेल भरला जातो. जवळपास पंधरा मिनिटं परतवाडा डेपो मध्ये बस डिझेल भरल्यानंतर परत एकदा माझी बस आता बस स्टैंड वर फलट क्रमांक 12 वर येऊन थांबते. ह्या फ्लॅटवरून धारणी,भोकरबडी, तुकाईवड, खांडवा आणि शेवटी इंदोर ह्या मार्गावर जाणारे बसेस थांबतात.
आतापर्यंत नागपूरपासून 200 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता. परतवाडा बस स्टैंड वर माझ्या गाडीचे चालक आणि वाहक यांची बदली झाली.
परतवाडा बस स्टैंड वर एकूण बारा फ्लॅट दिलेले आहेत.परतवाडा ते बऱ्हाणपूर चा अंतर मेळघाट मार्गे जवळपास 80 किलोमीटरचा आहे. बरोबर सकाळी 10:30 वाजता माझी बस परत एकदा परतवाडा बस स्टँड मधून बाहेर पडली .
इथून पुढे मेळघाट मार्गे माझी बस आता प्रवास करत बिहाली इथून पुढे घटांग ह्या ठिकाणावरून होत पुढे सेमाडोह ह्या ठिकाणी दुपारी 12:15 वाजता चहापाणीसाठी दहा मिनिटं थांबा घेतली.
सेमाडोह पासून धरणी जवळपास 45 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता.तब्बल पंधरा मिनिटं थांबल्या नंतर परत एकदा माझी बस प्रवास करत हरिसल नंतर धरणी बस स्टँडवर दुपारी 1: वाजता पोहोचली.
धारणीपासून बऱ्हाणपूर हा जवळपास 80 किलोमीटरचा अंतर आहे. धारणी बस स्टँड पासून परत एकदा माझी बस आता धावत धुळघाट पासून पुढे महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमारेषा ओलांडून देडतलाई ह्या ठिकाणावरून होत पुढे तुकईथड ह्या ठिकाणावरून होत.
तसेच मांजरोड नंतर खकणार नंतर बराच काळ रस्त्यावर प्रवास करत माझी बस आता डोईफोडीया नंतर दर्यापूर कडून पुढे तापी नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता बऱ्हाणपूर बस स्टैंड वर दुपारी चार वाजता पोहोचली.
बराणपुर बस स्टँड पासून इंदोर 180 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता. हा अंतर्गत गाठण्य्साठी जवळपास साडेपाच तासांचा कालावधी लागतो.
बऱ्हाणपूर इंदोर हायवे वरून प्रवास करत पुढे देशगाव नंतर सनावद ह्या ठिकाणावरून होत ओमकारेश्वर मोरटाका हायवे वरून प्रवास करत पुढे नर्मदा नदीचा पुल ओलांडून बडवाह नंतर पुढे चोरल घाट पार करत ऋषिका ढाबा ह्या ठिकाणी रात्री 8:30 वाजता जेवणासाठी माझी बस थांबा घेते.
Nagpur To Indore Final Destination
ह्या ठिकाणावरून इंदोर 125 किलोमीटरचा अंतरावर आहे.भैरव घाट पार करत पुढे सिमरोल ह्या ठिकाणावरून होत माझी बस आता इंदोर बस स्टैंड वर रात्री 10:00 वाजता पोहोचली.
अशाप्रकारे माझा नागपूर ते इंदोर चा हा प्रवास पूर्ण झाला.
FAQs
How long does it take to drive from Nagpur To Indore?
14 Hours
What is the cost of the bus ticket from Nagpur To Indore?
850 रुपये
What are the boarding points from Nagpur To Indore?
अमरावती, परतवाडा, हरीसाल, धरणी, बऱ्हाणपूर