नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Solapur to Udgir नळदुर्ग मार्गे केलेला प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
Table of Contents
Solapur to Udgir Via Naldurg Distance

तर मित्रांनो सोलापूर ते उदगीर नळदुर्ग मार्गे च्या अंतर 190 किलोमीटरचा आहे. हा अंतर गाठण्यासाठी जवळजवळ 5 तासांचा कालावधी लागतो.
Solapur To Udgir MSRTC Bus Timetable
Solapur Bus Stand वरून Udgir जाण्यासाठी ह्या वेळानुसार निघतात.
| From | To | Timings | Routes |
| Solapur | Udgir | 2:30 | Naldurg, Umarga, Nilanga |
सोलापूर बस स्टँडवर भरपूर गर्दी पाहायला मिळाली.हा बस नेहमी गजबजलेल्या असतो.बस स्टँडचा बांधकाम नवीन आणि भव्य आहे तसेच आतला परिसर कॉंक्रीटचा आहे. हा ठिकाण कर्नाटका राज्यच्या जवळ आहे त्यमुळे इथे कर्नाटका राज्यातील गाड्या आणि लोक दिसतील.ह्या बस स्टँडवरून लांब पल्याचे भरपूर गाड्या सुटतात.आणि आज जो मार्ग मी निवडला होता ते त्यातील एक होता.तर मित्रानो बरोबर दुपारी 2:30 वाजता माझी बस सोलापूर बस स्टँड इथून फलाट क्रमांक 2 वरून पासून नळदुर्ग मार्गे उदगीर गाठण्यासाठी सुरू झाली.
सोलापूर शहरामध्ये भवानी पेठ इकडून पुढे माझी बस आता हैदराबाद हायवेवरून 43 किलोमीटर म्हणजे नळदुर्ग पोहोचण्यासाठी मला जवळपास दीड तासांचा कालावधी लागला.
नळदुर्ग नंतर माझी बस उमरगाच्या दिशेने धावली .एक्सप्रेस हायवेवरून धावत असताना मुळेगाव तांडा या ठिकाणावरून होत बोरामणी नंतर तांदूळवाडी नंतर इटकळ इथून पुढे फुलवाडी या ठिकाणी टोलनाका पार करत पुढे अंदुर बस स्टैंड वर पोहोचली.अंदुर बस स्टैंड खुप छोटासा आहे आणि फलाट कमीच आहेत.हा अंदुर बस स्टैंड हायवे सोडून खुप आत मध्ये आहे.
परत एकदा तुळजापूर नाका इथून पुढे इटकळ नंतर नळदुर्ग बस स्टैंड वर दुपारी 3:30 वाजता पोहोचली.नळदुर्ग बस स्टैंड ग्रामीण आणि जुनाच वाटतो.आतला परिसर मातीचाच आहे.लाही काही मोठा बस स्टैंड नाही आहे.
इथून पुढे नळदुर्ग पासून उमरगा हा 40 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी परत एकदा सिंगल रस्त्यावर धावू लागते. हा अंतर गाठण्यासाठी जवळपास दीड तासांचा कालावधी लागतो.
नळदुर्ग बस स्टैंड वरून पुढे हायवेवरून डाव्या बाजूवाला वळत माझी बस जळकोट नंतर दस्तापुर येणेगुर नंतर डाळिंब नंतर येळी तसेच पुढे जाकेकुर नंतर माझी बस आता उमरगा बस स्टैंड वर दुपारी 4:30 वाजता फलट क्रमांक चार वर पोहोचली.उमरगा बस स्टैंड वर सोलापूर वरून सगळे प्रवाशी उतरले त्यामुळे बस निम्मी खाली झाली होती.उमरगा बस स्टैंडचा आतले रस्ते डांबरीचे आहेत.
उमरगा ते उदगीर निलंगा मार्गे 105 किलोमीटरचा अंतर शिल्लक राहिला होता. हा अंतर गाठण्यासाठी जवळजवळ अडीच तासांचा कालावधी लागतो .तसेच इथून निलंगा 56 किलोमीटरचा अंतरावर स्थित आहे हा अंतर गाठण्य्साठी तासभर ते दीड तास लागतो.
Solapur To Udgir Ticket Price
सोलापूर ते उदगीर जवळपास 300 रुपयांचा हा टिकीट भाडा आहे जे कालांतराने कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे याचे प्रवाशांनी नोंद घ्यावी.
पुढे तुरोरी नंतर हायवेच्या डाव्या बाजूला वाळत मुळज नंतर कुन्हाळा नंतर कासार सिरसी बस स्टँडवर संध्याकाळी 5:15 वाजता पोहोचली. ह्या ठिकाणी माझी गाडी 10 मिनिटे चहापाण्यासाठी थांबली.कासार सिरसी हा निलंगा आगार आणि लातूर विभागाअंतर्गत मोडतो. कुन्हाळा ह्या ठिकाणी रस्ता थोडासा खराब आणि सिंगल रोड होता.कासार सिरसी बस स्टँड पत्र्याच्या बांधलेला एक शेड सारखा आहे.खूपच छोटासा असा हा कासार सिरसी बस स्टँड आहे.आतला परिसर एकदम मातीचा आणि दगडाने भरलेला दिसून येईल.
या ठिकाणावरून निलंगा २६ किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे.
पुढे हसोरी बुद्रुक या ठिकाणावरून होत तसेच पुढे हरी जवळगा नंतर भूतमुगली नंतर लिंबाळा तसेच पुढे निलंगा या ठिकाणी अशोक नगर कडून पुढे कासार शिरसी मोड इथून होत माझी बस आता निलंगा शहरातून वाट काढत निलंगा बस स्टैंड वर संध्याकाळी 6:10 वाजता पोहोचली.कासार सिरसी बस स्टँड ते निलंगा बस स्टैंड पर्यंत रस्ता कच्चा आणि सिंगल रोड होत.
निलंगा बस स्टॅन्ड हा लातूर विभागा तसेच निलंगा आगारांतर्गत मोडतो.लांबोटा इथून पुढे झारी नंतर अंबुलगा नंतर धनेगाव नंतर वलांडी नंतर पुढे देवणी बस स्टैंड वर पोहोचली.निलंगा बस स्टॅन्ड इथे हळूहळू संध्याकाळ होत आलेली होती.
देवणी बस स्टँड वरून उदगीर हा 18 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला होता. हा अंतर गाठण्य्साठी जवळपास अर्धा तासांचा कालावधी लागला.निलंगा बस स्टॅन्ड पासून देवणी पर्यंतचा रस्ता खूपच खराब वाटला कारण रस्ता पूर्णपणे उखडून गेला होता.
पुढे उदगीर जवळ माळेवाडी ईकडून होत माझी बस आता उदगीर बस स्टैंड वर रात्री 8:00 वाजता पोहोचली.
- Distance: 190 किलोमीटर
- Routes: Naldurg, Umarga, Nilanga
- Timings: 2:30 P.M
- Travel Duration: 5 Hours
- Bus Ticket Price MSRTC: 300 Rupees
अशाप्रकारे माझा Solapur To Udgir Via Naldurg मार्गेचा हा प्रवास पूर्ण झाला.
Read More
- Solapur To Ichalkaranji Bus Journey
- Solapur To Mumbai Bus Journey
- Solapur To Nashik By MSRTC
- Solapur To Pune By E-Shivai Bus
- Solapur To Udgir By MSRTC
FAQs
How long does it take to drive from Solapur To Udgir Via Naldurg?
5 Hours
What is the minimum bus ticket fare from Solapur To Udgir Via Naldurg?
300 Rupees