नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या Solapur To Ichalkaranji ह्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे.
तर मित्रांनो ज्या गाडीने प्रवास केला ती गाडी Eicher Company असून बरच पैकी लांबलचक होती. गाडीचे आतील दृश्य बद्दल माहिती सांगायचं झालं तर गाडीचे सीट्स पुलबॅक होत्या याचा अर्थ म्हणजे तुम्ही आराम करण्यासाठी सीटला मागेपुढे वळू शकता.
सोलापूर बस बस स्टँड खूपच मोठा आहे.इथे तुम्हाला लोकांची आणि गाड्यांची रहदारी पाह्यला मिळेल.भरपूर लांब पाल्याचे गाड्या इथून सुटतात.
सोलापूर हा कर्नाटका राज्याच्या खूप जवळचा जिल्हा आहे म्हणून तुम्हाला इथे कर्नाटका राज्यातील रहिवासी तसेच त्या भागातील सर्वात जास्त गाड्या पाहायला मिळतील.आतला परिसर कॉंक्रीटचा होता आणि बस स्टँडचा बांधकाम आधुनिक तसेच नवीन आहे.
या गाडीचा मार्ग सोलापूर पासून पंढरपूर, सांगोला, मिरज आणि शेवटी इचलकरंजी अशा प्रकारे आहे.गाडी मध्ये सगळे सोयी दिले आहेत जसे mobile charge करण्यासाठी प्रत्येक सीटच्या बाजूला Charging Point.
Solapur To Ichalkaranji MSRTC Bus Timetable
खाली तुम्हाला Solapur To Ichalkaranji Bus Timetable पाहायला मिळेल.सोलापूर ते इचलकरंजी जाण्यासाठी सगळ्या गाड्या खाली दिलेल्या वेळानुसार निघतात.
| From | To | Timings | Routes |
| Solapur | Ichalkaranji | 07:00, 10:15, 12:00, 13:30, 14:30, 17:30 | Pandharpur, Sangola,Sangli,Miraj,Jaysingpur |
Table of Contents
Solapur To Ichalkaranji Distance

सोलापूर पासून इचलकरंजी चा अंतर 290 किलोमीटर आहे. तर माझी गाडी मित्रांनो आता सोलापूर बस स्टँड येथून बरोबर 12:00 वाजता आपला पुढचा टप्पा गाठण्यासाठी निघाली.
हायवेवर धावत असताना बाळे ह्या ठिकाणावरून होत तसंच पुढे कोंडी नंतर चिंचोलीकती नंतर सावळेश्वर या ठिकाणी असणारा टोल नाका पार करून लांबोटी या गावावरून पुढे वडवळ नंतर मोहोळ बस स्टैंड वर थोड्या वेळासाठी थांबा घेते.
मोहोळ बस स्टैंड हायवेच्या बाजूलाच आहे. हा एक महत्वाचा थांबा आहे कारण ह्या मार्गावर इथून सगळ्याच गाड्यांचा थांबा आहे.पुढे परत एकदा धावत पोखरापूर,सारोळे,पेनुर नंतर तुंगत अशाच प्रकारे नारायण चिंचोली,देगाव,चंद्रभागा नदीच्या पुलावरून प्रवास करत तसेच पुढे पंढरपूर येथे असणारा भीमा नदीच्या पुलावरून प्रवास केल्यानंतर पंढरपूर बस स्टैंड वर फलाट क्रमांक 23 वर दुपारी 1:30 वाजता पोहोचली.
पंढरपूर बस स्टॅन्ड हा माझा मार्गावरचा पहिला टप्पा होता. पंढरपूर बस स्टॅन्ड महाराष्ट्रातील सर्वात लांबलचक बस स्टँड मधला एक आहे.ह्या बस स्टँडवर तुम्हला गाड्यांची आणि लोकांची भरपूर रहदारी पाहायला मिळेल.आतला परिसर स्वच्छ आणि कॉंक्रीटचे रस्ते आहे.
इथून पुढे माझी गाडी सांगोलाच्या दिशेने निघाली होती. पंढरपूर बस स्टँडवरून आता माझी गाडी भक्ती मार्गे सांगोला नाका इथून पुढे टाकळी या ठिकाणानंतर खर्डी नंतर संगेवाडी तसेच पुढे मांजरी त्याच्यानंतर बामणी अशाच प्रकारे सांगोला बस स्टँड वर दुपारी 2:30 वाजता फलाट क्रमांक 5 वर पोहोचली.
अशाप्रकारे पंढरपूर बस स्टँड वरून एक तासाचा प्रवास करत मी आता सांगोला बस स्टैंड फलाट क्रमांक 5 वर पोहोचलो होतो.सांगोला बस स्टैंडच्या समोर तुम्हाला फलाट बघायला मिळेल.हा सांगोला बस स्टैंड सुद्धा खूप मोठा आहे.आतला परिसर मस्त आहे. सोलापूर पासून सांगोला पर्यंतचे रस्ते एकदम जबरदस्त वाटले.
सांगोला बस स्टँडवरून आता माझी गाडी मिरज या शहराच्या दिशेने धावू लागली. हायवेवर धावत असताना गोडसेवाडी या ठिकाणावरून होत वाटंबरे, अंकढळ या ठिकाणी असणारा टोल नाका पार करत उडानवाडी, पाचेगाव खुर्द, हातीद, काळूबाळूवाडी, टिप्पेहळी, घोरपडी, निमाज, नागज फाटा,शेळकेवाडी नंतर कुची या ठिकाणी रस्त्यावर थांबा घेत नरसिंहगाव, जायगव्हाण, शिरढोण नंतर माझी बस अग्रणी नदीच्या छोटा आणि पूर्ण जुना असलेला पुलावरून प्रवास करत बराच काळ प्रवास केल्यानंतर आता माझी बस बोरगाव या ठिकाणी असणारा टोल नाक्यावरून पुढे अल्कुड इथून पुढे बराच काळ धावत आता भोसे या ठिकाणावरून तसंच पुढे सिद्धेवाडी, कळंबी या गावावरून होत माझी बस आता मिरज इथे मिशन हॉस्पिटलच्या कडेने होत पुढे शाहू चौक इथून मिरज बस स्टैंड वर फलाट क्रमांक 7 वर संध्याकाळी 4:30 वाजता पोहोचली.
मिरज शहर वैद्यकीय उपचारासाठी फार प्रसिद्ध आहे.इथे तुम्हाला भरपूर हॉस्पिटल पाहायला मिळतील.इथे फार लांबून लोक उपचारसाठी मिरज मध्ये येतात.मिरज दुसऱ्या अजून एक कारणासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे हजरत ख्वाजा मोहमद मीरा दर्गा.मिरज बस स्टँडवर नेहमीच गाड्यांची आणि प्रवाशांची गर्दी आणि रहदारी पाहायला मिळते.
मिरज बस स्टँड सोडल्यानंतर आता माझी बस आता निलजी या ठिकाणावरून होत पुढे इनाम धामणी नंतर अंकली येथे असणारा कृष्णा नदीच्या पुलावरून प्रवास करत माझी बस आता उदगाव ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून प्रवास करत जयसिंगपूर बस स्टँड वर पोहोचल्यानंतर पुढे सिंगल रस्त्यावरून प्रवास करत शिरूर बायपास रस्त्यावर धावत चिंप्री, कोडिंग्रे यड्राव,राजवाडा इथून पुढे इचलकरंजी बस स्टैंड वर संध्याकाळी 5:45 वाजता पोहोचली.
- Distance: 290 किलोमीटर
- Routes: सोलापूर पासून पंढरपूर, सांगोला, मिरज आणि शेवटी इचलकरंजी
- Timings: 07:00, 10:15, 12:00, 13:30, 14:30, 17:30
- Travel Duration: 5.30 Hours
- Ticket Price: Rs.350
सोलापूर ते इचलकरंजी Final Destination
अशाप्रकारे माझा सोलापूर ते इचलकरंजी चा प्रवास पूर्ण झाला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला याच्याबद्दल माहिती द्या आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद.
Read More
- How I Traveled From Solapur To Udgir Via Naldurg
- How I Travelled From Solapur To Amravati by Sleeper Bus
- Solapur To Mumbai Bus Journey
- Solapur To Nashik By MSRTC
- Solapur To Udgir By MSRTC
- How To Travel From Solapur To Pune By E-Shivai Bus
FAQs
How Much Is Solapur To Ichalkaranji Msrtc Bus Ticket Price?
Rs.350 Approximately
How Long Does It Take To Drive From Solapur To Ichalkaranji?
5.30 Hours
What Is Solapur To Ichalkaranji Distance By Road?
290 किलोमीटर
What Are The Boarding Points From Solapur To Ichalkaranji?
सोलापूर पासून पंढरपूर, सांगोला, मिरज आणि शेवटी इचलकरंजी