नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगद्वारे Solapur To Udgir ह्या मार्गावरील केलेल्या प्रवासाबद्दल माहिती पुरवणार आहे.
Table of Contents
Solapur To Udgir Distance

Solapur To Udgir चा अंतर जवळपास 190 km आहे.हा अंतर गाठण्य्साठी कमीतकमी साडेतीन लागतो .
Solapur To Udgir MSRTC Bus Timetable
Solapur Bus Stand वरून Udgir जाण्यासाठी खाली दिलेल्या वेळानुसार निघतात
| From | To | Timings | Routes |
| Solapur | Udgir | 02:30 | Naldurg, Umarga, Nilanga |
तर मित्रांनो तर मी होतो सोलापूर बस स्टँडवर सोलापूर ते उदगीर ह्या मार्गावर प्रवास करण्यासाठी.सोलापूर बस स्टँड बद्दल सांगायचं झालं तर हा बस स्टँड महाराष्ट्रातील सर्वात जास्त गजबजलेल्या बस स्टँड मधला एक आहे.ह्या बस स्टँडवर तुम्हाला कर्नाटका राज्याचे गाड्या भरपूर प्रमाणात दिसून येईल.कारण सोलापूर जिल्हा कर्नाटका राज्याचा जवळ असणारा एक असा जिल्हा आहे.
सोलापूर बस स्टँड बद्दल सांगायचं महणजे हे बस स्टँड खूपच मोठा आहे.ह्याचा आवार कॉंक्रीटने बनवलेला आहे.फार स्वच्छ आणि सुंदर बांधकाम असणारा असा एक महाराष्ट्रातील बस स्टँड.
बरोबर 2:00 वाजता माझी गाडी सोलापूर बस स्टँड मधून बाहेर पडली. भवानी पेठ इकडून पुढे तुळजापूर नाका कडून पुढे हिप्परगा नंतर हायवे वरून प्रवास करत पुढे उळे ह्या गावावरून होत बराच काळ हायवे वरून धावत तामलवाडी ह्या ठिकाणावरून थोडाच पुढे टोल नाका पार करत सुरत गाव नंतर मालुंब्रा नंतर सांगवी मर्डी तसेच पुढे सिंदफळ नंतर माझी गाडी highway च्या उजव्या बाजूला वळण घेत तुळजापूर घाट पार करत मी आता पोहोचलो होतो तुळजापूर बस स्टैंड वर दुपारी 3:15 वाजता.सोलापूर बस स्टँड ते तुळजापूर बस स्टैंड पर्यंत हायवेचा रस्ता मस्त वाटला.
तुळजापूर बस स्टैंड मोठा तर आहे पण आतला परिसर मातीचा आहे जेणेकरून प्रवाशांना उन्हाळा काळात धुलचा आणि पावसाळी काळात चिकलचा त्रास सहन करावा लागतो.
तुळजापूर शहरातून बाहेर पडत माझी बस आता उस्मानाबाद हायवे वरून प्रवास करत बावी इकडून पुढे वडगाव तसेच बराच काळ प्रवास करत आता माझी बस धाराशिव ह्या ठिकाणी हायवेच्या उजव्या बाजूला वळत अहिल्यादेवी होळकर चौक इकडून पुढे अण्णाभाऊ साठे चौक इकडून सिंगल रोड वरून प्रवास करत माझी बस धाराशिव शहरातून वाट काढत माझी बस आता धाराशिव बस स्टैंड वर दुपारी 3:45 वाजता पोहोचली.
धाराशिव बस स्टैंडचा आतला परिसर डांबरीकरण झालेला आहे.ह्या धाराशिव बस स्टैंडवर भरपूर गर्दी दिसली.उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव बस स्टैंड करण्यात आलेला आहे.आता बरेच प्रवासी गाडी मध्ये चढले होते.
धाराशिव बस स्टँड मधून बाहेर पडत आता माझी बस छत्रपती शिवाजी महाराज चौक इकडून पुढे बसवेश्वर चौक कडून पुढे शिंगोली इथून बराच काळ हायवेवर प्रवास करत अळणी कडून पुढे उजव्या बाजूला वळत रुई ढोकी च्या सिंगल रस्त्यावरून प्रवास करत तसेच जावळे दुमला नंतर खामगाव नंतर रुई ढोकी नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक कडून होत पुढे कोळेगाव नंतर मुरुड बस स्टैंड वर थोडा काळासाठी थांबा घेतल्यानंतर परत एकदा आपला टप्पा गाठण्यासाठी माझी बस धावू लागली. रुई ढोकी पासून मुरुड बस स्टैंड पर्यंत रस्ता सिंगल होता त्यामुळे गाडीला जास्त वेळा लागला.
बोरगाव बुद्रुक ह्या ठिकाणावरून पुढे मुरुड अकोला नंतर बराच काळ हायवेवरून प्रवास करत तसेच पुढे हरंगुल बुद्रुक नंतर पाखरसांगवी नंतर पुढे लातूर येथे एकमत चौक कडून होत तसेच ज्योती नगर ह्या ठिकाणावरून होत नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक इकडून होत.
आता माझी बस लातूर मध्यवर्ती बस स्टैंड वर संध्याकाळी 6:15 वाजता पोहोचली.इथून पुढे आता माझी बस उदगीरच्या दिशेने दोन तासांचा प्रवास करण्यासाठी परत एकदा लातूर बस स्टँडच्या बाहेर पडली.आता पर्यंत बऱ्या पैकी संध्याकाळ झाली होती आणि सूर्य मावळला होता.हळूहळू सगळीकडे अंधार पसरत चालला होता.लातूर मध्यवर्ती बस स्टैंड वर ह्या वेळी भन्नाट गर्दी दिसली.
Solapur To Udgir Final Destination
स्वामी विवेकानंद चौक इकडून पुढे कोलपा नंतर भातखेडा वरून पुढे मांजरा नदीच्या पुलावरून प्रवास करत पुढे ममदापूर पाटी नंतर आष्टामोड नंतर नळेगाव बस स्टैंड वर पोहोचत परत एकदा माझी बस रस्त्यावरून प्रवास करत मलकापूर ह्या ठिकाणावरून होत शेवटी माझी बस उदगीर बस स्टैंड वर रात्री 8:45 वाजता पोहोचली.लातूर ते उदगीरचा अंतर जवळपास 80 km चा आहे.लातूर ते उदगीरचा रस्ता एवढं काही खास नव्हता.रस्त्यावर भरपूर खड्डे दिसले आणि काही ठिकाणी रस्ता सिंगल होता.
- Distance: 190 km
- Routes: सोलापूर,तुळजापूर,धाराशिव,लातूर,
- Timings: 02:30
- Travel Duration: 5.30 Hours
- Ticket Price: 150 Rupees
अशाप्रकारे माझा सोलापूर ते उदगीरचा हा हा प्रवास पूर्ण झाला.
Read more
- Solapur To Amravati by Sleeper Bus
- Solapur To Ichalkaranji Bus Journey
- Solapur To Mumbai Bus Journey
- Solapur To Nashik By MSRTC
- Solapur To Pune By E-Shivai Bus
- Solapur To Udgir Via Naldurg
FAQs
How long does it take to drive from Solapur?
5.30 Hours
How much is Solapur To Udgir msrtc bus ticket price?
150 Rupees Approximately